

Baramati News: राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानं बारामतीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी बारामतीतील विमान दुर्घटनेची बातमी आली अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते,पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. पण आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय,विमान वाहतूक तज्ज्ञ आणि तपास संस्था या अपघाताची कसून चौकशी करत आहे. यातच आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवारांच्या विमानाचा अपघातात झाला. या अपघातात तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण आता अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. तो आता फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतलं असून या अपघाताचा कसून तपास सुरू आहे.
फॉरेन्सिक लॅबला सापडलेल्या ब्लॅक बॉक्स,तसेच अवशेष आणि तांत्रिक पुराव्यांमधून अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. बारामती विमान अपघाताच्या सविस्तर तपासाला काही आठवडे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. DGCA चे अधिकारी दिल्लीहून बारामतीत दाखल होत आहेत. लँडिंग दरम्यान झालेला हा अपघात फक्त एक अपघात आहे की, एखाद्या मोठ्या चुकीचा परिणाम आहे हे अद्याप समोर आलं नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारं एक खाजगी विमान बारामती येथे उतरताना कोसळलं. रिपोर्टनुसार,धावपट्टीजवळ Learjet 45 विमानाचं नियंत्रण सुटलं आणि दादांचं दुर्दैवी निधन झालं. विमान अपघातापूर्वी जोरदार टक्कर आणि इंधन टाकीला आग लागली. आता विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणं समोर येणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय,विमान वाहतूक तज्ज्ञ आणि तपास संस्था ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचा वापर उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांची माहिती सर्व गोष्टींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. तपासाचा मुख्य केंद्रबिंदू अपघात स्थळ राहणार असून विमानाचे अवशेष,आघाताचे दृष्टीकोन,धावपट्टीपर्यंतचे अंतर आणि कोणत्याही जळण्याच्या खुणा या सर्वांची काळजीपूर्वक नोंद केली जाईल.
बारामती येथे धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते जवळच्या शेतात कोसळलं. अपघातावेळी विमानात काही बिघाड झाले होते का? उड्डाण भरण्यासाठी विमान पूर्णपणे सुरक्षित आहे का? अशा सर्व संभाव्य गोष्टींची चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व मुद्द्यांवर कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. तपाससंस्थांना एटीसी आणि पायलटमधील संभाषणाचे अधिकृत रेकॉर्ड देखील उपलब्ध असणार आहे.
विमानाने बारामती विमानतळावर लँडिंगसाठी पहिला प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पायलटने सुरक्षिततेच्या दृष्टीने गो-अराउंड करत विमान पुन्हा हवेत घेतले. त्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगसाठी अप्रोच घेत असताना अचानक काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमानाचा ताबा सुटल्याने ते धावपट्टीच्या थोड्याच अंतरावर कोसळले.
रनवे 11 च्या थ्रेशोल्डजवळ विमान जमिनीवर आदळले आणि जोरदार स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. काही अहवालांनुसार विमान धावपट्टीपासून सुमारे 100 फूट आधीच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.