Ajit Pawar Politics : पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आणायचीच, अजितदादांनी मनावर घेतलंय! उद्योगनगरीत नवे राजकीय समीकरण

Ajit Pawar PCMC Election NCP : अजित पवार यांनी नुकताच पिंपरी-चिंचवडचा दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आगामी महाापलिकेची रणनीती निश्चित केल्याची चर्चा आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : पिंपरी-चिंचवड म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अजित पवार यांनी स्वतः पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत येथील विकासाला चालना दिली. मात्र, 2014 नंतर राजकीय वातावरण बदलले आणि भाजपचा जोर वाढला. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसकडील सत्ता भाजपने आपल्याकडे घेतली. आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र महायुतीत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडची सत्ता परत घेण्याची रणनीती अजित पवारांनी आखली आहे.

मागील दोन दिवस अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. . जनसंवाद आणि 'राष्ट्रवादी परिवार मिलन' असे त्यांचे उपक्रम नव्या समीकरणाचीच जुळवाजुळव ते करत होते. जनसंवादातून लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर लगेच तोडगा काढण्याचे निर्देश ते देत होते. तर, पिंपरी विधानसभा मतदारसंघात १३ ठिकाणी थेट स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, समाजसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला.

अजित पवारांच्या या दौऱ्याने आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी, कार्यलयात जात त्यांच्याशी चर्चा केली. यातून निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. कासारवाडी राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमांतर्गत अजित पवार यांनी रविवारी पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांसह समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीत इन्कमिंग?

अजित पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग होण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे हे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते. पराभवानंतर देखील ते ठाकरेंच्या सक्रीय होते. मात्र, ते मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवारांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पावरांनी त्यांच्या दौऱ्यात संजोग वाघेरे यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यामुळे वाघेरे हे पुन्हा राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे महायुतीत एकत्र आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. महापालिकेत त्यांची युती होणे शक्य नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष तयारीला लागले असून सत्ता मिळवण्याची हे दोन्ही पक्षांचे धोरण आहे. अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडे दौरे वाढल्याने भाजप देखील सावध झाली असून त्यांनी देखील निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com