Ajit Pawar on Mahayuti Government : एकनाथ शिंदेंच्या पत्रकारपरिषदेवर बोलताना अजितदादांनी महायुतीच्या नव्या सरकारचा 'फॉर्म्युला'च सांगितला, म्हणाले...

Ajit Pawar reveals new formula of Mahayuti government : 'उद्या आम्ही तिघेही जण दिल्लीला जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर आमची सगळी पुढची चर्चा होईल. त्यानंतर...' असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar reaction on Eknath Shinde Press : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारपरिषद घेत, महायुतीच्या भावी मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल असं जाहीर केलं. त्यानंतर लगेचच भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारपरिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीरपणे कौतुक करत आभार मानले. त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देत महायुतीच्या नव्या सरकारचा थेट फॉर्म्युलाच सांगितला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे मीडियाला प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, ''मी महाराष्ट्रातील तमाम मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मनापासून आभार मानतो. परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आज तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, की आज एकनाथ शिंदे(Ekanath Shinde) यांनीही पत्रकारपरिषद घेतली आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचीही पत्रकारपरिषद झाली. परंतु ती काही मला ऐकायला मिळाली नाही, कारण मी त्यावेळी छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी निघालो होतो.''

याचबरोबर ''उद्या आम्ही तिघेही जण दिल्लीला जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर आमची सगळी पुढची चर्चा होईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांचे सरकार अस्तित्वात येईल. पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे. पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील. अशा फार कामाचा दबाव आमच्यावर राहणार आहे.'' असंही अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule PC : फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सुकर करणाऱ्या एकनाथ शिंदेंचं भाजपकडून जाहीर कौतुक!

तसेच '' पण आम्हा बहुतेक जणांना अनुभव असल्याने, त्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही. चांगल्या पद्धतीने राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न समाजातील सर्व घटकांना सोबत नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्याप्रमाणावर निधी देखील आणण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून होईल.'' असं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shinde PC News : 'CM' पदाचा राजीनामा दिल्यानंतरची पहिलीच पत्रकार परिषद ; शिंदे भरभरुन बोलले अन्...

याशिवाय, ''दिल्लीत गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्याने, मी तिथे प्रमुखांनाही भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होवून, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार त्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उद्याच्या सगळ्या चर्चेनंतर त्याला अंतिम रूप येईल.'' अशी माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com