
Ajit Pawar : मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युल्यावर एकनाथ शिंदे खूश नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांना वर्षभरासाठी मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांमधील हवाच अजित पवार यांनी काढून घेतली.
पुणे दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यांचाच मुख्यमंत्री होणार आहे. तसेच मंत्रिमंडळाता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत, असे स्पष्टच सांगून टाकले.
दिल्लीतील बैठकीत मंत्रिमंडळाचा फाॅर्म्युला ठरल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळात असणार असल्याचे ते म्हणाले. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलन स्थळी भेट देखील अजित पवारांनी दिली.
काही गोष्टी निवडून आयोगाशी संबंधित आहेत. निवडणूक आयोगा ही स्वायत्ता संस्था आहे. काही सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत.त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडत विरोध जेव्हा विजयी होतात तेव्हा ते ईव्हीएमवर आक्षेप घेत नाही, असा टोला देखील विरोधकांना लगावला.
आराम करण्यासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी पडले आहेत. त्यांना ताप असल्याने डाॅक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. शिंदे हे मागील एक महिन्यापासून प्रचारात व्यग्र होते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आपल्या गावी गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.