Jay Pawar: वऱ्हाड निघालं बहरीनला!अजितदादांच्या लेकाचा शाही विवाह; राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना निमंत्रण

Ajit Pawar Son Jay Pawar Royal Wedding: जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.4 ते 7 डिसेंबर २०२५ या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे.
Ajit Pawar Son Jay Pawar
Ajit Pawar Son Jay Pawar Royal WeddingSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Son Jay Pawar Royal Wedding : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र श्रीनिवार पवार यांचा विवाह नुकताच थाटामाटात पार पडला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन येथे होते आहे. या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरु आहे.

जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.4 ते 7 डिसेंबर २०२५ या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे.

या सोहळ्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. या विवाहास पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आल्याची माहिती आहे.

४ डिसेंबर रोजी मेहंदी, ५ डिसेंबर रोजी हळद, वरात आणि मुख्य लग्नसोहळा, ६ डिसेंबर रोजी संगीत, तर ७ डिसेंबर रोजी स्वागत समारंभ असे नियोजन दोन्ही परिवाराकडून करण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनाचा या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा भव्य विवाह सोहळा नुकताच (३० नोव्हेंबर) रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटर येथे झाला. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Ajit Pawar Son Jay Pawar
Yugendra Pawar Wedding : युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्या सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स; फोटो पाहा

अजितदादांची सून ऋतुजा पाटील कोण आहेत?

  • जय पवार हे अजित पवारांचे धाकटे सुपुत्र आहेत.

  • ऋतुजा या फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत.

  • ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com