Ajit Pawar Statement: 'क्लिनचीट'च्या चर्चांवर अजितदादा स्पष्टच बोलले; म्हणाले, ''ईडीकडून अद्याप...''

ED Chargesheet in Maharashtra State Cooperative Bank Scam Case : ईडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून अजित पवार, सुनेत्रा पवार यांची नावं वगळल्याची माहिती....
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र,यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर येत आहे.यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याचवेळी अजित पवार यांनी नाव वगळल्याचं वृत्त फेटाळून लावतानाच रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.

Ajit Pawar News
Anjali damania Tweet Viral: ''...आणि लवकरच अजित पवार भाजपसोबत जाणार!''; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लिनचीट दिली की काय? अशी चर्चा सुरु आहे.यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ईडी(ED)ने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लिनचीट दिली की काय? अशी चर्चा सुरु आहे.यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar News
Karnataka Elections 2024 : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, दोन लाख मिळवा ; JDS नेत्याचे अजब विधान ; काय आहे प्रकरण ?

काय आहे आरोप ?

ईडीच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने(Maharashtra State Cooperative Bank Scam Case) कायद्याचं पालन न करता एक साखर कारखाना कमी किमतीत आपल्या नातेवाईक आणि मित्रांना विकला होता.

ईडीनं या प्रकरणी जुलै २०२१ मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित मालमत्ता जप्त केली होती. यात कारखान्याशी संबंधित भूखंड, इमारती आणि यंत्रसामग्री यांचा समावेश होता. याची एकूण किंमत ६५ कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात आलं. कोरेगाव तालुक्यातला हा कारखाना काही वर्षांपूर्वी लिलावात विकला गेला. मात्र, तो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांनी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला.

Ajit Pawar News
Vinayak Raut News : भाजप नेत्यांसारखे बकवास करणारे आमच्याकडे नाहीत, नागपुरात दुप्पट लोक असतील !

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाण्याला 2010मध्ये गुरु कमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला 65.75 कोटी रुपयाला विकल्याचं या चौकशीतून निष्पन्न झालं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com