Akhilesh Yadav News : महाविकास आघाडीची चर्चाच सुरू, 'सपा'कडून उमेदवारही जाहीर ; आता अखिलेश यादवांचंही मोठं विधान, म्हणाले...

Akhilesh Yadav on MVA : जागा वाटप अंतिम होण्याआधीच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात का उतरवले हे देखील सांगितले.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Samajwadi Party Maharashtra: समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत धुळ्यात मोठं विधान केलं आहे. अखिलेश यादव यांनी म्हटले की, त्यांच्या पक्षाने महाविकास आघाडीला 12 जागा मागितल्या आहेत. दोन आमदार आमचे आधीपासूनच आहेत. आम्ही ते लोक आहोत जे कमी जागांवर समाधानी होतो. तसेच त्यांनी सांगितलं की त्यांचा पक्ष मजबूतीने निवडणूक लढवत आहे.

महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे काही उमेदवार जाहीर करण्यात आल्याबाबत त्यांना विचारणा केली असता, अखिलेश यादव(Akhilesh Yadav) म्हणाले. घोषित यासाठी केले आहेत की किमान आमच्या पक्षाची ताकद तरी दिसावी. यावेळी कोणताही उशीर करू इच्छित नाही. जिथे पक्ष मजबूत आहे तिथे आम्ही उमेदवार दिले आहेत.

Akhilesh Yadav
Akhilesh Yadav : अखिलेश यादव महाराष्ट्रात येऊन ‘एक घाव दोन तुकडे’ करणार; चेंडू ‘मविआ’च्या कोर्टात

याशिवाय अखिलेश यादव यांनी म्हटले की, हरियाणाची चूक आम्हाला परत करायची नाही. भाजप(BJP) खूप चालाख पक्ष आहे. त्यांनी तिथे हारलेली निवडणूक जिंकली. भाजपचे महाराष्ट्रात सरकार बनले नाही, तर त्यांची केंद्रातील सरकारही जाईल. केंद्रात भाजप आघाडीकरून सरकार चालवत आहे. ते दोन सहकारी पक्ष त्यांची साथ कधी सोडतील काही सांगता येत नाही.

Akhilesh Yadav
JMM and Congress News : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी JMM-काँग्रेससह 'I.N.D.I.A' आघाडीचं जागा वाटप ठरलं!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत(Mahavikas Aghadi) जागा वाटपाची एकीकडे चर्चा सुरू असताना, दुसरीकडे समाजवादी पार्टीने आपले पाच उमेदवार जाहीरही केले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचाही समावेश आहे. समाजवादी पार्टीने त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

तर भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख यांना उमेदवारी दिली गेली आहे. याशिवाय भिवंडी पश्चिम मतदारसंघातून रियाज आझमी हे उमेदवार असणार आहेत. तर मालेगावमधून साई-ए-हिंद हे समाजवादी पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. समाजवादी पार्टीने आज(शनिवार) इरशाद जहागीरदार यांना पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com