Akola Lok Sabha Election 2024 : अकोल्यात राजकीय वातावरण तापले असताना जिल्ह्यात निवडणूक कामासाठी आलेल्या होमगार्ड जवानांच्या प्रति पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हा प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून आला, तर प्रशासनातील माणुसकी कुठे लयास गेली असा प्रश्नच यानिमित्त समोर आला आहे. अकोल्यात सूर्य आग ओकत असताना निवडणूक कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून होमगार्ड तैनातीसाठी बोलविण्यात आले. पण, त्यांची कुठलीही सोय केल्या गेली नाही.
अकोल्यात आज 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यात उष्ण वारे वाहत असून, इतर जिल्ह्यातून आलेले होमगार्ड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पुलाच्या सावलीचा आधार घेत बसले होते. त्यांच्यापैकी काहींना भोवळ येत ते खाली कोसळले काहींना दवाखान्यात न्यावे लागले. पण, इतके सगळे होत असताना जिल्हा प्रशासन, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष अधोरेखित होत होते. सकाळी 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्याकडे कोणीच लक्ष का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हा सर्व प्रकार गंभीर असाच आहे. आलेल्या चारशे ते पाचशे होमगार्डपैकी कोणालाच नाश्ता, चहा, जेवण आदीची सोय जिल्हा प्रशासन, पोलिस विभागाने केली नसल्याची माहिती नागपूर येथून आलेल्या होमगार्ड जवानांने दिली. पोलिस विभागाचे दुर्लक्ष येथे अधोरेखित होत असून, रखरखत्या उन्हात निवडणुकीत बाधा येऊ नये म्हणून आलेल्या जवानांच्या प्रती इतका निष्काळजीपणा का केला गेला याची चौकशी होण्याची गरज आहे. कोट्यवधी रुपये निवडणुकीच्या नावाने खर्च होतात. पण, तैनातीसाठी आलेल्या जवानांची सोय मात्र केल्या जात नसल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
निवडणूक कर्तव्यावरील होमगार्ड रस्त्यावरच्या रखरखत्या उन्हात बसले असताना त्यांची सावलीत सोय करण्याची गरज होती. इतकेच नाही तर त्यांच्या जेवण आणि पाण्याची सोय का केल्या गेली नाही. केवळ त्यांच्या नावावे बिल काढण्यात येतील काय, असा प्रश्न इतर जिल्ह्यातून आलेल्या होमगार्ड जवानांना पडला होता. पोलिस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने होमगार्ड जवान तैनातीसाठी बोलविण्यात आले. पण, त्यांची सोय करण्यात प्रशासन व यंत्रणेला वेळ मिळाला नाही की त्यांनी दुर्लक्ष केले अशा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोल्यात तापमान चांगलेच वाढले असताना होमगार्ड पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य बाधित झाल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होतो. निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
अकोला जिल्ह्यात आज 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. अकोला लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर येथून होमगार्ड तैनातीसाठी बोलविण्यात आले. पण, त्यांची योग्य ती सोय करण्यात अकोला जिल्हा प्रशासन व अकोला पोलिस यांनी निष्काळजीपणा केल्याचे चित्र आहे. देशाचे (अमित शाह), राज्याचे गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) अकोल्यात भाजप प्रचारासाठी येत आहे. अशा वेळी अकोल्यात वाढत्या उन्हात होमगार्ड जवानांची गैरसोय होत असेल तर होमगार्ड जवानांकडे माणुसकीच्या नात्याने पाहण्याची शिकवण अधिकाऱ्यांना कोण देणार असा प्रश्न आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.