Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेतून मोठी अपडेट! तीन नगरसेवकांचे पद तात्काळ रद्द; 'या' एका कारणाने बसला मोठा धक्का

Akola Corporators News : 2026 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांवर अवैध जात प्रमाणपत्रामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. या तीन नगरसेवकांचे पद तात्काळ रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Akola News
Akola News Sarkarnama
Published on
Updated on

akola News : अकोला महापालिकेतून मोठी अपडेट समोर आली आहे. 2026 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांवर अवैध जात प्रमाणपत्रामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. या तीन नगरसेवकांचे पद तात्काळ रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलंबितामध्ये काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व MIM च्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे.

अकोला महापालिकेच्या 2026 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 अ मधून काँग्रेसच्या (congress) तिकीटावर शेख अब्दुल्ला शेख सलीम यांनी विजय मिळवला होता. तर प्रभाग क्रमांक 2 अ येथून एमआयएमच्या तिकीटावर सीमा अंजुम शेख अनिस या निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 ब चे नगरसेवक अमरीन सदफ सय्यद नाझीम हे निवडून आले होते. या तीनही नगरसेवकांचे नगरसेवक पद आता जात वैध प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन अपात्र ठरले आहे.

Akola News
Mumbai BJP : मुंबई महापालिकेत भाजपला लॉटरी! आणखी एक नगरसेवक वाढणार; 'या' पक्षाला मोठा धक्का

अकोला महापालिकेतील या तीनही नगरसेवकांची जातीची प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ठपका ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्राची जात पडताळणी करण्यात आली. अकोला महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी या तीनही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. हे तीनही नगरसेवक आरक्षित जागांवर निवडून आले होते. या कारवाईनंतर हे तीनही नगरसेवक उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहेत.

Akola News
Maharashtra Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा दणका; पुण्यासह 'या' शहरांतील 64 उमेदवार तीन वर्षांसाठी अपात्र; एका नियमाचा बसला फटका

या तीन नगरसेवकांनी आरक्षित असलेल्या प्रभागात निवडणूक लढली, पण ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, त्यांनी जात पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र सादर केले. याबाबत काही प्रकरणांचा निकाल प्राप्त झाला आहे. निवडून आलेल्या तीन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे जात पडताळणी समितीने घोषित केले आहे. त्याअनुषंगाने तीनही नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी दिली

Akola News
Maharashtra Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा दणका; पुण्यासह 'या' शहरांतील 64 उमेदवार तीन वर्षांसाठी अपात्र; एका नियमाचा बसला फटका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com