

अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी माजी आमदारांनी कंबर कसली आहे. मतदारसंघात आपली ताकद पुन्हा अजमविण्यासाठी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार पालिका निवडणुकीत सक्रिय झाल्याने राजकीय वातावरण ढळवून निघाले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अकोला जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे उदयाला आली आहे. राष्ट्रवादी अन् शिवसेनेत फेरबदल झाल्याने नवे नेतृत्व तयार होताना दिसते.
त्यांचे राजकीय वजन वाढत असल्याने माजी आमदारांना आपले महत्व कमी झाले का? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारापर्यंत पोहचण्याची ही संधी साधत माजी आमदार आता रस्त्यावर उतरत आहेत.
भाजपमधून शिंदेसेनेत आलेले माजी आमदार नारायण गव्हाणकर, शिंदेसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया हे आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. मतदारांशी गाठी-भेटी घेत असल्याचे चित्र आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी समर्थकांना एकत्र करून आपला राजकीय प्रभाव दाखविण्यास सुरवात केली आहे.
शिवसेनेतील शिंदे गटातील गोपीकिशन बाजोरिया अकोला शहरात पक्षाला संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी आघाडीवर आहे. आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तर दुसरीकडे भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत (शिंदे गट) आलेले नारायण गव्हाणकर यांनी शिंदेसेनेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.तर नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत जनतेशी संवाद साधण्यासाठी हरिदास भदे हे प्रचारात उतरले आहेत.
दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने माघार घेतल्याने कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यांना बिनविरोध निवडणूक आणण्यात आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.
कलोती यांच्या बिनविरोध निवडीनंतर राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून ही माहिती दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. चिखलदरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० (ब) मधून आल्हाद कलोती यांनी पहिल्यांदाच उमेदवारी दाखल केली होती.आता प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. कलोती अधिकृतरित्या विजयी घोषित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.