Jaysingpur Nagarpalika Election: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांचे गळ्यात गळे; बंटी पाटील-महाडिक गटाचेही सुर जुळले

Jaysingpur Shirol Politics BJP Congress Alliance: आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिरोळ तालुक्यात ताराराणी आघाडी म्हणजेच भाजपचे पदाधिकारी राजकारणात सक्रिय आहेत. मात्र हे दोन परस्परविरोधी गट एकत्र आले आहेत.
Jaysingpur Shirol Politics BJP Congress Alliance
Jaysingpur Shirol Politics BJP Congress AllianceSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कागल तालुक्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले समरजीत घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची अनपेक्षितपणे युती झाली. त्याचा संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आश्चर्याचा धक्का बसला. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनपेक्षितपणे घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये मोठी घडामोड घडली आहे.

जयसिंगपूर, शिरोळ नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसचा गट एकत्र आला आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकाला पाण्यात बघणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा काँग्रेस गट आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची ताराराणी आघाडी एकत्र आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तगडे विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे. राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून त्यांनी मागील वेळी जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक लढवून जिंकली होती. त्यामुळे यंदा जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये यड्रावकर विरोधक एकवटले आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीचे घटक पक्षातील आमदार आहेत. मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांशी आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्याशी राजकीय वैर असल्याने नगरपालिका निवडणुकीत भाजपने देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

Jaysingpur Shirol Politics BJP Congress Alliance
Bhandara Mahapalika Election: तिकीट नाकारलेले कार्यकर्ते आक्रमक, प्रफुल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी

अर्ज माघारीला काही तास शिल्लक असताना जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांमध्ये धक्कादायक आघाडी निर्माण झाली आहे. यड्रावकर यांच्या विरोधात जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांमध्ये भाजप आणि काँग्रेसचे गट एकत्र आले आहेत.

काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, भाजप नेते माधवराव घाटगे, जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते विजय भोजे, यांच्या आघाडीने सुत जुळवले आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आज त्या संदर्भात बैठक घेत जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिरोळ तालुक्यात ताराराणी आघाडी म्हणजेच भाजपचे पदाधिकारी राजकारणात सक्रिय आहेत. मात्र हे दोन परस्परविरोधी गट नगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र आले आहेत. शिरोळ नगरपालिकांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे.

Jaysingpur Shirol Politics BJP Congress Alliance
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार! सरकारचे नवे धोरण समजून घ्या

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि काँग्रेसचे नेते जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिकांमध्ये आघाडी करण्यात असल्याची माहिती वारंवार चर्चेत येत होती. मात्र अर्ज माघारीच्या काही तास अगोदर या प्रमुख नेत्यांनी बैठक घेत जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक चढवण्याचा निर्धार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com