

SSC HSC Exam 2026: दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. याची दखल राज्य मंडळाने घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल ॲपची निर्मिती केली आहे. अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करुन आता राज्य परीक्षा मंडळही हायटेक झाले आहे.
शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात अधिकृत माहिती एमएसबीएसएचएसईचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि सोशल मीडिया लिंक्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांना राज्य मंडळाचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स सबस्क्राईब करून अपडेट राहता येणार आहे.
आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेदरम्यान महत्वाच्या सूचना प्रसारित करण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे, तरी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
याबाबत आपल्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी, असे परिपत्रक मंडळाने काढले आहे. याबाबत सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना कळविण्यात आले आहे.
https://www.youtube.com/(@Maharashtra State Board
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahahsscboard.MSBS
https://whatsapp.com/channel/0029Vb6r9IU0VycPbHCee709
https://www.facebook.com/msbshsepune/
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.