BACCHU KADU : अमरावतीत प्रहार ची 'फाइट' वातावरण एकदम 'टाइट'

Amravati : शिवसेना मनात आहे, असे म्हणणारे कडवट शिवसैनिक दिनेश बूब यांनी प्रहारमध्ये आज प्रवेश केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती येथे प्रहारचा उमेदवार उभा करत महायुतीला चॅलेंज केले.
Bachchu Kadu, Dinesh Bub
Bachchu Kadu, Dinesh BubSarkarnama
Published on
Updated on

Amravati Loksabha Election 2024 : बच्चू कडू यांनी महायुतीला मोठा झटका देत अमरावती येथून प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला वारंवार अल्टिमेटम दिला होता. त्यांनी अखेर अमरावती येथे उमेदवार घोषित करत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. मतांचे विभाजन अमरावती येथे झाल्यास त्याचा फायदा कोणाच्या पथ्यावर पडतो हे पाहण्यासारखे ठरेल.

बच्चू कडू यांनी महायुती त्यांना चर्चेत बोलवत नाही. त्यांचे म्हणणे ऐकत नसल्याचे सांगितले होते. बच्चू कडू यांनी महायुतीत गेल्याची खंत अनेकदा व्यक्त केली. अशा परिस्थितीत अमरावती येथे थेट बच्चू कडू यांनी उमेदवार घोषित करत महायुतीला अडचणीत आणले आहे. बच्चू कडू हे प्रहारच्या माध्यमातून राज्यातील शिवसेना नेते शिंदे आणि भाजप नेते फडणवीस यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकतात. अमरावती जिल्ह्यात प्रहारचे दोन आमदार आहे. त्यांना विचारत न घेता लोकसभा निवडणूक होणे हे मोठे संकट उमेदवारासमोर ठरू शकते. अशा वेळी आज प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिनेश बूब या जुन्या शिवसैनिकाला तिकीट घोषित करत अमरावतीत नवा अध्याय सुरू केला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu Kadu, Dinesh Bub
Lok Sabha Election 2024 : "भाजपनं मैत्री जपली पाहिजे अन्...", शिंदे गटातील नेत्यानं सुनावलं

अमरावती काँग्रेस तर्फे बळवंत वानखडे आणि भाजपतर्फे नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित झाली आहे. नवनीत राणा यांना भाजपअंतर्गत मोठा विरोध होता. युवा स्वाभिमानने भाजप कार्यालय फोडल्याचे शल्य अमरावती भाजप नेत्यांच्या मनात सतत बोचणारे असून, थेट दिल्लीतून उमेदवारी निश्चित झाल्याने भाजपच्या अमरावती येथील नेत्यांचे मतदेखील जाणून घेणे पक्षाने टाळले होते. त्यामुळे भाजप अंतर्गत धुसफूस आणि बच्चू कडू यांचा प्रहारचा उमेदवार पाहता अमरावती येथील निवडणूक चांगलीच चुरशीची होईल. इतकेच नाही तर अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार घोषित केला आहे. वंचितने येथे प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली आहे. अमरावती येथे वंचितची लाखाची सभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी झाली होती. तिथे सुजात आंबेडकर यांना तिकीट देण्याची मागणी स्थानिक वंचित नेत्यांनी केली होती.

ग्रामीण भागात प्रहारचे शेकडो कार्यकर्ते ही बच्चू कडू यांच्यासाठी मोठी राजकीय ओळख आहे. अशा परिस्थितीत सत्तापक्षाच्या सापत्न वागणुकीने कंटाळलेले बच्चू कडू लोकसभेत स्वतःची ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघांत प्रहार आपले उमेदवार उभे करण्याचे संकेत यापूर्वीच बच्चू कडू यांनी दिले होते. अमरावती येथे बच्चू कडू यांच्या प्रहारसाठी दिनेश बूब हे उमेदवार असू शकतात. अशी बातमी 'सरकारनामा'ने दिली होती. ती आज खरी ठरत आहे. शिवसैनिक असलेले दिनेश बूब हे अमरावती मतदारसंघात चांगलीच 'फाइट' देण्याची तयारीत आहे. त्यामुळे अमरावतीचे वातावरण मात्र 'टाइट' होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा आणि शिवसैनिक दिनेश बूब यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील बच्चू कडू यांची मैत्री महायुतीच्या नेत्यांनी वारंवार टाळली, त्यामुळे अखेर बच्चू कडू यांनी उमेदवार घोषित करत महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट संकेत दिले. त्याच बरोबर राज्यातील महायुती सरकारचा ते या मुद्द्यावरून पाठिंबा काढतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी थेट महायुतीचे व शिवसेना नेते मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला उमेदवार नाकारला आहे. युवा स्वाभिमानमधून तिकीट मिळाल्यावर भाजपमध्ये आलेल्या नवनीत राणा यांची उमेदवारी भाजपने घोषित केली आहे. अशा परिस्थितीत प्रहारचा उमेदवार, शिवसैनिक दिनेश बूब यांच्यात निवडणूक होणार आहे.

R

Bachchu Kadu, Dinesh Bub
Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांनी राऊतांना आघाडीपासून केलं वेगळं; ‘मविआ’बाबत म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com