Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांनी राऊतांना आघाडीपासून केलं वेगळं; ‘मविआ’बाबत म्हणाले...

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांनी काल राऊतांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. एकीकडे आघाडीचा संभ्रम निर्माण करून दुसरीकडे आम्हाला पराभूत करण्याचे षडयंत्र करत असल्याचेही ते म्हणाले होते.
Prakash Ambedkar, Sanjay Raut
Prakash Ambedkar, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आठ उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले. त्यानंतर काल खासदार संजय राऊत यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. त्यामुळे आंबेडकर आघाडीपासून दूर गेल्याची चर्चा होती, पण आघाडीतील नेते मात्र त्यांनी एकत्र यावे, असे वारंवार बोलत आहेत. त्यातच आज आंबेडकरांनीही मविआ आणि राऊतांना वेगळ करत त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवार जाहीर करतानाच काँग्रेसच्या (Congress) दोन उमेदवारांना पाठिंबाही जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ते मविआमध्ये आहेत की नाही, याबाबत चर्चांना ऊत आला होता. अखेर आज त्यांनी यावर पडदा टाकला. अजूनही मविआसोबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी आज मीडियाशी बोलताना दिले.

Prakash Ambedkar, Sanjay Raut
Sharad Pawar: श्रीनिवास पाटलांची माघार, सातारचा उमेदवार कोण? पवारांनी सांगितली 'ही' चार नावं

राऊतांवर (Sanjay Raut) केलेल्या टीकेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. ते चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत,’ असे म्हणत आंबेडकरांनी ‘मविआ’बाबत मवाळ भूमिका घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मविआकडून वंचितसाठी पाच ते सहा जागांचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. तीनही प्रमुख पक्ष आपल्या कोट्यातून जागा देण्यास तयार असल्याचेही बोलले जात आहे. या चर्चांवर बोलताना आंबेडकरांनी आतापर्यंत वंचितला केवळ तीनच जागांचा प्रस्ताव आल्याचे सांगितले. आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात अकोला आणि दुसऱ्या दोन जागा होत्या. यापलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे ते म्हणाले.

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधी आघाडी

या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी, असा होता. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

R

Prakash Ambedkar, Sanjay Raut
Lok Sabha Election 2024 : 'शिर्डीची एक जागा आम्हाला मिळायला हवी होती'; आठवलेंची जाहीर खंत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com