Ambadas Danve News: '' निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे..''; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Political News: पुन्हा एकदा शेवाळे ठाकरे गटाच्या रडारवर....
Ambadas Danve, Rahul Shewale
Ambadas Danve, Rahul ShewaleSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve On Rahul Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणी माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आऱोप केले होते. यानंतर ठाकरे गटाकडून शेवाळे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा शेवाळे ठाकरे गटाच्या रडारवर आले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. 'भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने निर्णय घेतला आहे. 2024 पर्यंच्या सर्व निवडणुका भाजप जे.पी. नड्डा यांच्याच नेतृत्त्वात लढणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे.याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. आता याच फोटोवरुन ठाकरे गटानं शेवाळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेवाळेंवर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve, Rahul Shewale
Kolhapur Politics: कोल्हापूरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

अंबादास दानवे यांनी टि्वट केलं आहे. यात दानवे यांनी वा राहुल शेवाळेजी, निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे? कितीही उंबरे झिजवा, यंदा तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात आम्ही चितपट करू. गाठ खऱ्या शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आहे, ध्यानी असू द्या असा इशारा देतानाच दानवे यांनी राहुल शेवाळेंवर सडकून टीका केली आहे.

Ambadas Danve, Rahul Shewale
PM Narendra Modi News : मोदींचे मराठीतून टि्वट , म्हणाले, "मी मुंबईत असेन.."

दुबईस्थित ३३ वर्षीय तरुणीने लग्नाच्या बहाण्याने शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकऱणी शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ट्विटद्वारे तक्रार केली होती.यानंतर शेवाळे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आता गंभीर आरोप केलेल्या तरुणीविरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शेवाळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात सोशल मीडियावर आपली बदनामी केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. तसेच या महिलेशी नाव जोडून इतरांनी टाकलेल्या पोस्ट हटवण्याची मागणी देखील शेवाळे यांनी केली आहे. या याचिकेद्वारे समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवल्याबद्दल संबंधित तरुणीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com