

Ambadas Danve News : राज्यात महायुतीच्या सरकारला एक वर्ष झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत घेत महायुती सरकारने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला. तर, विरोधकांनी वर्षभरात सरकारच्या कामगिरीमुळे राज्य कसे मागे गेले हे सांगितले. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत 15 मुद्दे मांडून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली आहे.
प्रचंड बहुमत तरी सत्ताधारी पक्षांचा परस्परांवर प्रचंड अविश्वास,पार्थ पवार, मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, संजय राठोड सारख्या घपलेबाजांना राजश्रय. लोकांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या आमदारांना अभय, शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतीवर वरवंटा अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी वाऱ्यावर, ही देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षभरातील उपलब्धी असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे गायब, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर, शासन आपल्या दारी योजना बंद, फलटणला महिला डॉक्टरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बदमाशांना अभय,स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एक आरोपी अजूनही फरार, महादेव मुंडे प्रकरणात केवळ चौकशी, अशी कामगिरी असल्याची टीका देखील दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे.
सरकार गेल्या वर्षभरातील कामगिरीवर टीका करताना दानवे म्हणाले की, अजून बरंच आहे. महायुती सरकारच्या महाराष्ट्र थांबणारी नाही, या घोषवाक्याची खिल्ली उडवताना हे सरकार घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही.., अशी टीका देखील त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.