Amit Shah on Maharashtra Tour : विधानसभेसाठी भाजपने कसली कंबर; अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार!

BJP and Maharashtra Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय पक्षांना वेध लागले आहेत.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. एकीकडे विधानपरिषदेसाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाहांचा हा दौरा विशेष मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजप(BJP) नेतृत्वातील एनडीए आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपच्या जागांमध्ये घट झाली आहे, मात्र मित्र पक्षाच्या मदतीने देशात पुन्हा एकदा मोदी सरकारने कामकाज सुरू केले आहे.

इकडे महाराष्ट्रातही भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या तुलनेत विरोधातील महाविकास आघाडीने लोकसभेच्या अधिक जागा जिंकल्या आहेत.

आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. त्यानुसार राजकीय घडामोडींनाही हळूहळू वेग येत आहे. सर्वच पक्ष आपल्या परीने या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपनेही कंबर कसल्याचे दिसत आहे.

Amit Shaha
Raosaheb Danve and Vidhan Parishad: मराठवाड्यातील 'डॅमेज कंट्रोल'साठी भाजप रावसाहेब दानवेंना विधान परिषदेवर पाठवणार?

भाजपचे राष्ट्रीय स्तरानवरील प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत आगामी रणनितीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणा राज्यातही अमित शाह यांचा दौरा होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या या दौऱ्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात बसलेला फटका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रोडमॅपवर चर्चा झाली होती. त्यानंतर आता अमित शाह प्रत्यक्ष महाराष्ट्रात येणार आहेत.

Amit Shaha
BJP meeting : भाजप कोअर कमिटीचा मोठा गृहपाठ; विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरली

दरम्यान सध्या भाजपच्या गोटात विविध घडामोडी सुरू आहेत. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील काही प्रमुख चेहऱ्यांना ज्यांना लोकसभेत अपयश आलं, त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. 13 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

यामध्ये भाजपकडून पाच जागांसाठी 11 जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve), राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह रासप नेते महादेव जानकर यांच्याही नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com