
Jalindar Supekar News : तब्बल 448 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमधून IPS अधिकारी जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. 448 कोटींच्या कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी निविदा मागवून व नियमानुसारच झाली आहे, असे म्हणत गृहविभागाने सुपेकर आणि गुप्ता यांना क्लिन चीट दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी तत्कालिन अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता आणि तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. 448 कोटी रुपयांची कारागृह वस्तू पुरवठ्याची नियमबाह्य कंत्राटे दिली असा आरोप या दोघांवर झाला होता.
याबाबत वडगाव शेरीचे आमदार बापुसाहेब पठारे यांनीही पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2022-23 आणि 2023-24 या दरम्यान सीसीटीव्ही, जनरेटर पॅनिक बटण, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, वैद्यकीय उपकरणे, रेशन आणि कँन्टीनसाठीच्या वस्तूंची 448 कोटींची खरेदी झाली होती. ही प्रक्रिया जीएम पोर्टल आणि महाईटेंडरवर नियमाप्रमाणे राबण्यात आली होती.
निविदेची मुदत, जाहिरातीची प्रसिद्धी, एल 1 निविदाकारास स्वीकृतीचा देकार या प्रक्रिया नियमानुसार राबवण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयातही या खरेदीबाबत 2 याचिका दाखल झाल्या होत्या. पण याचिकांमध्ये योग्यता दिसून येत नसल्याचे सांगत दोन्ही याचिका 4 जुलै रोजी निकालात काढल्या आहेत, असेही फडणवीस यांनी उत्तरात स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.