Amol Kolhe : "अन् निवडणुकीच्या तिकीट वाटपात पहिला गेम त्याचाच होतो" : भाजपच्या निष्ठावंतांवरील अन्यायवर अमोल कोल्हेंची खास कविता

BJP ticket allocation injustice Maharashtra : निवडणुकीच्या तिकीट वाटपात भाजपच्या निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायावर अमोल कोल्हेंनी कवितेतून जोरदार टीका केली आहे.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येताच महाराष्ट्रभरात राजकीय वातावरण तापलेले दिसले. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वात जास्त वेदना कुणाच्या वाट्याला येत असतील, तर त्या तळागाळात राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या. राज्यातील अनेक शहरांत पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ, वाद, राडे झाले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या अनावर झाल्या की त्यांचा उद्रेक रस्त्यावर दिसून आला.

Amol Kolhe
Sanjay Raut : बिनविरोध निवडणुकीसाठी 'किडनॅपिंग'; संजय राऊतांनी फोडला बॉम्ब; नेमकं प्रकरण काय?

अचानक झालेले पक्षप्रवेश, ऐनवेळी पक्ष बदलून आलेल्यांना मिळालेली तिकीटं आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्याला डावलले जाणे, या सगळ्यामुळे ‘सामान्य कार्यकर्त्याचं नेमकं स्थान काय?’ हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला.

याच वास्तवावर बोट ठेवणारी, मनाला भिडणारी कविता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सादर केली आहे. या कवितेचं नाव आहे ‘तो अश्वत्थामा’. ही कविता केवळ शब्दांचा खेळ नाही, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या न बोलल्या जाणाऱ्या वेदनांचा आरसा आहे.

अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ पोस्ट करत जी कविता सादर केली आहे. कविता पुढीलप्रमाणे-

त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता बॅनर लागतो, नावा आधीचा 'भावी' हा शब्द लिहून-वाचून गुळगुळीत होतो.

कडक इस्त्रीचे कपडे घालून तो सकाळपासून सज्ज असतो,कधी साहेबांसोबत, कधी त्यांच्या वतीने लग्न ते मयत सगळं करतो.

वेळ पडली तर बायकोचे दागिने गहाण ठेवून तो पक्षाचे कार्यक्रम करतो,घरचे सण-समारंभ, वाढदिवस सगळं विसरून तो पक्षासाठी मर-मर मरतो.

कालपर्यंत छातीवरची दोन बटणं उघडी ठेवून वावरणारा तो,निवडणूक लागताच जॅकीट घालतो,पांढरी झालेली खुरटी दाढी घोटून घोटून गुळगुळीत करतो.

पण कालपर्यंत अण्णा, आप्पा, साहेबांचा 'उजवा हात',आज अचानक दादा नाही तर भाऊचा मार्गदर्शक होतो,बाप आणि लेक दोघांच्याही बॅनरवर हा जरा कोपऱ्यात सरकतो.

मात्र निवडणुकांच्या तिकीट वाटपात पहिला गेम त्याचाच होतो,युती, आघाडी, इलेक्टोरल मेरिट यात पहिला बळी हा त्याचाच जातो.

घाऊक पक्षप्रवेशांच्या भाऊगर्दीत तो कोपऱ्यात तळाशी तुडवला जातो, पुन्हा सतरंजा उचलताना एकच प्रश्न भेडसावत राहतो, "साला, या सगळ्यात आपण नेमकं कुठे कमी पडतो?

कधी समर्थकांच्या गराड्यात तर कधी दारूच्या ग्लासात तो आतल्या आत धुमसत राहतो,स्वतःच्या स्वप्नांचा झालेला चुराडा तो हताशपणे बघत बसतो.

विखुरलेल्या त्या स्वप्नांच्या तुकड्यांमध्ये तो पुन्हा स्वतःला पाहतो, भाळी भळभळती जखम असलेला तो अश्वत्थामा... हाच कार्यकर्ता असतो!

तो अश्वत्थामा हा कार्यकर्ताच असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com