Sanjay Raut : बिनविरोध निवडणुकीसाठी 'किडनॅपिंग'; संजय राऊतांनी फोडला बॉम्ब; नेमकं प्रकरण काय?

Unopposed election controversy Maharashtra : बिनविरोध निवडणूक करण्यासाठी अपहरण केल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर.
Sanjay-Raut
Sanjay-RautSarkarnama
Published on
Updated on

'निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात होणाऱ्या 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदार पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वीच अनेक जागांवर उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. त्यामुळे राजकारणाच मोठी खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोपांच्य फैरी सुरु झाल्या आहेत.

सध्या राज्यात उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याची स्पर्धा सुरू आहे. महायुतीच्या उमेदवारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय विजय मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडले जात असून धमक्या दिल्या जात असल्याचेही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मंत्र्यांकडून थेट धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Sanjay-Raut
MNS : मुंबईत मनसेची तटबंदी ढासळली! 11 शिलेदारांचा 'तडकाफडकी' राजीनामा; काय आहे नेमकं कारण?

राऊत यांनी सांगितले की, 'निवडणूक आयोगाने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. मात्र, चौकशी सुरु होताच त्या संबंधित ठिकणाचे सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहेत. या धक्कादायक प्रकाराकडे महापालिका आयुक्तांनी याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमक्या दिल्या गेल्याच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

जळगावमध्ये तर उमेदवारांचं किडनॅपिंग करून उमेदवाराला अर्ज माघारी घ्यायला लावलाचा गंभीर आरोप यावेळी केला आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी, ही जी स्पर्धा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. उमेदवारांना धमकावणे, पैशांचा वापर करणे आणि ब्लॅकमेलिंग करून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay-Raut
Kolhapur Corporation Election : कोल्हापुरात 'हायहोल्टेज ड्रामा!' बंडखोरांचे फोन 'नॉट रीचेबल', तर एका जागेसाठी मोठी फिल्डिंग; आज काय घडणार?

या संपूर्ण प्रकारात प्रतिक्रिया देताना ज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे निवडणूक अधिकारी काय करत आहेत, असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिका निवडणुका बिनविरोध झालेल्या कधीच नव्हत्या, असे सांगत त्यांनी या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com