Bachchu Kadu : बच्चू कडू कडाडले 'त्याचे परिणाम चांगले होणार नाही....'

Amit Shah : निवडणूक सुरू असताना फक्त प्रशासन असते. तेथे सत्ताधारी नसतात. प्रशासन एक बाजू घेऊन बोलत असेल तर हे योग्य नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
Amit Shah, Navneet Rana, Bachchu kadu, Sharad Pawar
Amit Shah, Navneet Rana, Bachchu kadu, Sharad Pawar Sarkarnama

Amravati Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी भाजप आक्रमक असून, ते प्रशासनाच्या माध्यमातून अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांनी प्रहारची 24 एप्रिल रोजी सायन्स स्कोअर मैदानावर सभा होईल असे स्पष्ट करत 23 एप्रिलपासून आम्ही ते मैदान ताब्यात घेऊ, असेही त्यांनी सांगितले. यासाठीची प्रहारची बुकिंग असून, त्याचे पैसे भरल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. पण, प्रशासनातील अधिकारी प्रहारच्या कार्यकर्त्यांना फोन करत धमकावित आहेत. लोकसभा निवडणूक सुरू असताना निःपक्षपणे प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. पण, तसे होत नाही. याचे परिणाम गंभीर असतील, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

एका मांडवात दोन सभा घ्या, असे पत्रकारांनी विचारल्यावर बच्चू कडू यांनी एका एका लग्नात दोन लग्न होणार नाहीत. आमच्याकडे शिटी आहे. कोणाला थांबवायचे आहे ते आम्ही थांबवू असेही सांगितले. अमरावती येथे अमित शाह यांच्या सभेसाठी प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मैदानच नाही, सीट पण आरक्षित असल्याचे बच्चू कडू म्हणाले. प्रशासनाने जोर जबरदस्ती केली तर निवडणूक सोडून उपोषण करण्याचा इशारा कडू यांनी दिला. पैसे भरले, पावती भेटली. आम्ही आमचे पेंडाॅल टाकून ठेवला आहे. आरक्षित असलेले मैदान शक्तीचा वापर झाला तर उपोषण करण्याचा इशारा प्रहारने दिला आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah, Navneet Rana, Bachchu kadu, Sharad Pawar
Sharad Pawar News : भाजप-शिवसेनेत दुरावा निर्माण व्हावा म्हणून पवारांनी 2014 ला केला होता 'हा' प्लॅन!

शरद पवार एकदा नाही, दोनदा चुकले

शरद पवार यांनी गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याबद्दल मते मागितले. त्यांना पाठिंबा दिल्याची चूक झाल्याचे सांगत आज अमरावती येथे अमरावतीकरांची माफी पवारांनी मागितली. यावर बच्चू कडू यांनी नापसंती व्यक्त केली. शरद पवार यांनी माफी मागायची गरजच नव्हती. त्यांनी उगाच माफी मागितली. हे सांगत बच्चू कडू यांनी पवार एकदा नाही तर दोनदा चुकल्याचे सांगितले. पवार यांनी रवी राणा यांना आमदार केले. त्यांच्या पाठिंब्यावर सरकार केल्याची चूक झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागायची गरज नव्हती, असेही कडू म्हणाले. मुंबईतून फोन येणे बंद झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. दिल्ली आणि मुंबईच्या फोनला घाबरत नाही. गावातून कोणाचा फोन आला तर आपण घाबरतो असेही बच्चू कडू म्हणाले.

इतर जिल्ह्यातील राजकारण माहीत नाही. तिथे स्थानिक सोयीनुसार प्रहारचा पाठिंबा स्थानिकांनी दिला आहे. मी फक्त अमरावतीत आहे, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष बायकोने फोडला. त्यांना कुणाच्या तरी पाठिंब्याची नेहमीच गरज असते. त्यामुळे ते पाठिंबा शोधत फिरतात, असा आरोप कडू यांनी राणा यांच्यावर केला. भाजप जातीच्या नावावर मतं मागत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. काँग्रेसने संपूर्ण राज्यात कुठेही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

तुषार भारतीय 'बाजीराव' निघाला.....

भाजपचे सर्व लोक नवनीत राणा यांना शरण गेले. पण, तुषार भारतीय हे खरे बाजीराव निघाले. त्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार पण केला नाही, त्यांना पाठिंबा दिला नाही. तुषार भारतीय यांनी भाजपच्या इतर नेत्यांना आरसा दाखविल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. ज्या नेत्यांना अमरावती ते मुंबई रेल्वेत मारत मारत नेण्याची गोष्ट केली जात होती. ते नेते राणांच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका कडू यांनी केली.

शेतकरी मात्र 'वंचित'च

निवडणूक सुरू असताना कापसाचे भाव 800 रुपये प्रतिक्विंटल आणि तुरीचे भाव 1,500 रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले. पण, शेतकऱ्यांच्या या समस्येकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना त्याकडे कुणाचे लक्ष नाही, असे म्हणत शेतकरी त्यांच्या हक्कापासून वंचित राहिल्याचा दावा कडू यांनी केला. तर शासकीय अधिकाऱ्याचे निवडणूक काळात पगार कमी केले असते तर त्याचा गाजावाजा झाला असता पण, शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी नाही, अशी खंत कडू यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी मतदानातून व्यक्त होण्याची गरज कडू यांनी व्यक्त केली.

R

Amit Shah, Navneet Rana, Bachchu kadu, Sharad Pawar
Prakash Ambedkar : मोदी हिंदूविरोधी की, मुस्लिमविरोधी ? आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com