Maharashtra Politics : अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर पहिल्यापासून शरद पवारांची भाजप सोबत जाण्याती इच्छा असल्याचा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातदेखील अजित पवारांनी 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा घोषित केल्यानंतर काही काळाने आपल्यालादेखील सत्तेत सहभागी व्हायचे आहे, असे शरद पवारांनी सांगितलं होते, असे म्हटले आहे. अजित पवारांच्या या आरोपांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'2014 च्या निवडणुकीत भाजपला BJP पाठिंबा देणे हा शिवसेनेला भाजपपासून वेगळे करण्यासाठी प्लॅन होता. व्यक्तिशः मला भाजपमध्ये जाण्यात रस नव्हता. आम्ही आमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालो. आज उद्धव ठाकरे आमच्या सोबत आहेत. अजित पवारांना भाजपसोबत जायचे नव्हते त्यांना सत्तेत जायचे होते', असा दावा शरद पवार Sharad Pawar यांनी केला आहे.
2014, 2017, 2019 मध्ये शरद पवार यांनाच भाजपसोबत जायचे होते. त्यासाठी ते भाजपसोबत चर्चा करत होते. काही चर्चांनी मीदेखील होतो, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर चर्चा केल्या मात्र भाजपसोबत जाण्याचा कोणताही विचार नव्हता, असे शरद पवार यांनी ठासून सांगितले. 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ती कृतीदेखील आपल्याला आवडली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच जर माझी संमती होती तर मग अजित पवारांनी तीन दिवसांनी राजीनामा का दिला? असा सवालदेखील शरद पवार यांनी उपस्थित केला.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये होत असलेल्या निवडणुकीत विजयी कोण होणार , असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता कोण विजयी होणार हे जनताच ठरवेल, असे उत्तर दिले. तसेच बारामतीत घरात निवडणूक झाली नसती तर आनंदच झाला असता, असेदेखील शरद पवार म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.