Amit Shah : फडणवीस आणि शाह यांनी दिली शरद पवारांना माफीची लिस्ट....

Navneet Rana : गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना मते द्या सांगितले म्हणून माफी मागणाऱ्या शरद पवार यांना आज देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी माफीवरून टार्गेट करत त्यांनी कोणा कोणाची माफी मागावी याची लिस्टच दिली.
Amit Shah, Sharad Pawar
Amit Shah, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Amravati Lok Sabha Election 2024 : बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी आरक्षित सायन्स स्कोअर मैदानावर भाजपची प्रचार सभा आज अमरावतीत झाली. मी जिद्दी आहे, असे म्हणत अमित शाह यांनी बसून जा म्हणत मीडियाचे कॅमेरामन यांना आज खाली बसविले. तुम्ही खाली बसले नाही तर, मी सुरूच करणार नाही, असे म्हणत त्यांनी मीडियाचे कॅमेरामन खाली बसविले. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर यांना प्रमाण करत गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण सुरू केले. अमरावती येथे नवनीत राणा यांच्या नावासमोरील कमळाचे निशाण आहे त्यावर मत देणार का, अशी विचारणा केली. कमळच्या निशाणावर मत देणे म्हणजे नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करणे होय. आतंकवाद, नक्षलवाद नष्ट करण्यासाठी हे मत आहे. देशप्रेमी यांच्या बाजूने तुमचे मत जाणार आहे. रामराज्यासाठी हे मत आहे. परिवारवादासाठी नाही, असे म्हणत इंडिया आघाडीला शाह यांनी लक्ष्य केले.

मोदींशिवाय काही कामे झालीच नसते असे म्हणत अयोध्येत राम मंदिर जे झाले ते मोदी यांच्यामुळे झाले. काँग्रेसने 70 वर्षे राम मंदिर होऊ दिले नाही. शिवसेनेचे नकली अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांच्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आले नाहीत. तब्येतीचे कारण पुढे करत शरद पवार हे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी आले नाहीत. पवार इलेक्शनमध्ये कसे फिरत आहेत, असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला. राहुल गांधींना अमरावतीत कोणी ऐकले नाही. अयोध्यात दर्शन घ्या, मग लोकं ऐकतील, असे म्हणत राहुल गांधी यांना शाह यांनी अयोध्येचे निमंत्रण दिले. अयोध्येत न येणाऱ्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभू श्रीरामांचा अपमान केला, असा दावा अमित शाह यांनी केला. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah, Sharad Pawar
Prithviraj Chavan News : 'स्टेटस' काढणाऱ्या आंबेडकरांना पृथ्वीराज चव्हाणांचं जशास तसं प्रत्युत्तर...

शरद पवार यांनी गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांना सपोर्ट केला म्हणून माफी मागितली. पवार यांनी विदर्भाच्या सिंचनासाठी काहीच केले नाही. त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराची माफी मागावी, असे म्हणत शरद पवार यांना अमित शाह यांनी टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस संविधान बदलण्याची अफवा पसरवित आहे. आरक्षण जाणार नाही ही नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे, असे शाह म्हणाले. अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काही केले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार घेत एकनाथ शिंदे समोर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सरकार असून, यापुढे कुण्या उमेश कोल्हे यांची हत्या होणार नाही, असा दावा अमित शाह यांनी केला.

शरद पवारांनी यांची माफी मागावी - फडणवीस

राहुल गांधी यांची देशात इंडिया आघाडीची खिचडी आहे. त्यांच्या खिचडीतील लोक राहुल गांधी यांना नेते मानायला तयार नाहीत. कम्युनिस्ट मुख्यमंत्री हे राहुल गांधी यांना अपरिपक्व असल्याचा आरोप करतात. शरद पवार यांनी नवनीत राणा यांची माफी मागितली. शरद पवार यांनी विदर्भावर अन्याय केला. अमरावतीवर अन्याय केला म्हणून त्यांनी विदर्भाची माफी मागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जनतेची माफी मागा असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांना डिवचले. नवनीत राणा हे वाघिणीचे नाव आहे, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी राणा यांना चौदा दिवस जेलमध्ये ठेवल्याची आठवण सांगितली.

चौदा वर्षे जेलमध्ये राहू शकतात नवनीत राणा....

सुनेच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. माझी बहीण नवनीत राणा चौदा वर्षे जेलमध्ये राहिली, असे एकनाथ शिंदे बोलले. त्यांचे हे वाक्य फडणवीस यांनी दुरुस्त करत त्या चौदा दिवस जेलमध्ये गेल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी त्या चौदा वर्षे जेलमध्ये राहू शकतात, असे म्हणत सभास्थळी हशा पिकला आणि नवनीत राणा यांनी दोन्ही हात जोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनीत राणा यांच्या प्रचार सभेतील हा नवा चौदा वर्षांचा दावा वादाचा विषय ठरू शकतो. राणा परिवाराला चौदा दिवस उद्धव ठाकरे यांनी जेलमध्ये ठेवल्याचे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा परिवार चौदा वर्षे जेलमध्ये राहिल्याचे सांगितले. त्यावर आता राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत.

R

Amit Shah, Sharad Pawar
Yavatmal Loksabha News : पुसदच्या सभेत नितीन गडकरींना आली भोवळ; अंगरक्षकांनी सावरले, पुन्हा केले भाषण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com