Amravati Lok Sabha Election News : मोदींची हवा नाकारणाऱ्या राणांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत !

BJP Politics News : मोदींची हवा नाही, बारा वाजेच्या आत मतदान करा असे म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना अमरावतीकर आज मतदान करता की नाही असा प्रश्न आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे.
Rana Vs Wankhede
Rana Vs WankhedeSarkarnama

Amravati Lok Sabha Election 2024 Voting : अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने राहुल गांधी यांची विशाल सभा घेत हम भी कम नही दाखवून दिले. त्यात लोकसभा प्रचारात अतिआत्मविश्वास दाखवित मोदींची हवा नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. त्यांच्या या वाक्याने अमरावती मतदारसंघातच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशात मोदींची हवा नाही, या विषयाला तोंड फुटले. (Amravati Election Voting LIVE )

नवनीत राणा यांच्या या वाक्याने मात्र भाजपचे चांगलेच हाल झाले. भाजपमध्ये येण्यापूर्वीच त्यांना भाजपने तिकीट दिल्यानंतरदेखील थेट एका सभेत मोदींची हवा नाही, बारापर्यंत मतदानासाठी प्रयत्न करा, असे कार्यकर्त्यांना सांगणाऱ्या नवनीत राणा यांच्या वाक्याने भाजपने कपाळावर हात मारून घेतला. राणा यांच्या एका वाक्याचे पडसाद अमरावतीतच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशात उमटले आहेत. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rana Vs Wankhede
Udayanraje On Sharad Pawar : 'शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यापुरताच मर्यादित...' उदयनराजेंचा खोचक टोला

बच्चू कडू यांच्या प्रहारला आधी सायन्स स्कोअर मैदान देत ते नंतर रद्द करण्याची हुकूमशाही अमरावती येथील प्रशासनाने केली.त्याचा हायहोल्टेज ड्रामा अमरावती लोकसभा निवडणुकीत रंगला. त्यानंतर सायन्स स्कोअरवर भाजप प्रचारासाठी अमित शाह यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौदा वर्ष नवनीत राणा जेलमध्ये राहतील, असा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यांनी ते वाक्य नंतर सुधारलेदेखील पण, लाइव्हच्या जमान्यात ते वाक्यदेखील व्हायरल झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण कोणाचे मते खाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कुठलाही वाद अंगावर ओढावून न घेता काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी अतिशय शिस्तबद्ध प्रचार केला. त्यांच्या प्रचाराला आलेल्या शरद पवार यांनी अमरावतीकरांची मागितलेली माफीदेखील चर्चेत राहिली. नवनीत राणा यांच्यासाठी गेल्यावेळी मत मागितल्यावरून पवारांनी माफी मागितली. या माफीवर फडणवीस आणि शाह तुटून पडले. त्यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीसाठी पवारांनी माफी मागण्याचा सल्ला दिला. एकूणच अमरावती लोकसभा निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे. अमरावती येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा यांच्यावर अगदी शेलक्या भाषेत टीका करत नवा वाद निर्माण केला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू याच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या ही लढत होईल.

अमरावती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, तेथील मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल.

जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असू,न सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदान केंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बूथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत.

R

Rana Vs Wankhede
Onion Export News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; गुजरातच्या कांद्याची होणार निर्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com