Udayanraje On Sharad Pawar : 'शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित...' उदयनराजेंचा खोचक टोला

Satara Loksabha Election 2024 : शशिकांत शिंदेंनी लोकांना रडवण्याचा डाव केल्याचाही आरोप
Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar, Udayanraje BhosaleSarkarnama

Karad News : शरद पवार यांच्या चार सभा घेतल्याचे मला सांगण्यात आले. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. त्यांनी चार नाही ४० सभा घ्याव्यात. कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात काय होत नाही. मग काय तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सातारा, माढा मतदारसंघात त्यांच्या सभा होत आहेत. एकेकाळी स्वतःचा राष्ट्रीय म्हणून रजिस्टर केलेला पक्ष प्रादेशिक पक्ष राहिला. आज त्यांचा पक्ष प्रादेशिक पक्षही राहिला नसून तो साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिलेला पक्ष आहे. हा आम्ही केलेला रडीचा डाव नाही. याला कर्मच म्हणतात, अशी उपरोधिक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar News : शरद पवारांचा राहुरीमधील सभेतून पंतप्रधान मोदी अन् विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल!

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी आज साकुर्डी (ता. कऱ्हाड) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत प्रचार सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक हातातून गेल्यामुळे कार्यकर्त्यांना दम देऊन रडीचा डाव खेळला जात आहे. असे काही घडले तर रस्त्यावर उतरू या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्य केले होते.

त्यावर खासदार भोसले म्हणाले, याला दम देणे नाही तर त्याला कर्म म्हणतात. जे पाप करतो ते याच जन्मी फेडावे लागते. हे आत्ता झालेले नाही. ते जामिनावर आहेत. ते न्यायालयात गेले. कोणता गैरव्यवहार केला नसता तर न्यायालयात जायचे कारण काय ? उच्च न्यायालयाने तुमचे नाव यात दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही जामीन देऊ शकत नाही असे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी या प्रकरणाची सही शिक्यासह कागदपत्रांची माहिती पत्रकारांसमोर दिली आहे. आम्ही रडीचा डाव खेळत नाही तर तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला. लाज वाटायला पाहिजे. मुंबई बाजार समितीत घोटाळे केले असतील अशा लोकांच्या हातात नेतृत्व दिले तर जिल्ह्याची काय अवस्था होईल. तुम्ही यशवंत विचार सांगता. मग यशवंतराव चव्हाण यांचे असे विचार होते ? त्यांचा लोक कल्याणाचा विचार होता.

सातारा लोकसभा मतदारसंघातील 18 लाख मतदारात एकही चारित्र्यसंपन्न व्यक्ती तुम्हाला मिळाला नाही. माझ्या मतदारसंघात शरद पवार Sharad Pawar यांच्या चार सभा घेतल्या आहेत, असे मला सांगण्यात आले. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. चार नाही 40 सभा घ्याव्यात.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Hingoli Lok Sabha News : हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा, गोविंदाही प्रचारात उतरवले; आता तरी बाबुराव येणार का?

कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेशात काय होत नाही. मग काय तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही सातारा, माढा मतदारसंघात त्यांच्या सभा होत आहे. एकेकाळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रजिस्टर केले होते. प्रादेशिक पक्ष म्हणुन त्यांच्या पक्षाची ओळख आहे. पण आता त्यांचा पक्ष प्रादेशिक पक्षही राहिलेला नाही. साडेतीन जिल्ह्यातच मर्यादेत राहिलेला त्यांचा पक्ष आहे. हा आम्ही केलेला रडीचा डाव नाही. याला कर्म म्हणतात, असा टोलाही उदयनराजेंनी शरद पवारांना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Chandrahar Patil News : चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com