Navneet Rana : भाजपच्या हायप्रोफाइल उमेदवार नवनीत राणा यांचे शिक्षण किती ?

Police FIR : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणातील एक गुन्हा दाखल असून, त्याचबरोबर शांतता भंग करणे आणि फसवणुकीचा गुन्हा भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात दाखल आहे.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama

Amravati Loksabha Election 2024 : नवनीत राणा यांच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा या 8 मे 2021 रोजी राणा परिवाराच्या घरासमोर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी रात्री 10.30 ते 11.15 या वेळेत दुग्धाभिषेक कार्यक्रम घेतला या संदर्भातील आहे. सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहानंतर लाउडस्पीकर न वाजविण्याच्या आदेशाच्या विरोधातील हे कृत्य ठरल्याने त्यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावतीच्या राजापेठ पोलिस स्टेशन येथे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत.

मुंबई येथील खार पोलिस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा, तर पोलिस स्टेशन मुलुंड येथे खोटे व बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे, तर देशभरात चर्चेत असलेला हनुमान चालिसा पठणाच्या वेळीचा गुन्हा नवनीत राणा यांच्यावर आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणे, गैरकायदेशीर मार्गाने सरकार विरुद्ध द्रोह केला, तसेच शांतता व सुव्यवस्थेचा भंग केल्याबाबतचा गुन्हा नवनीत राणा यांच्या विरोधात दाखल आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "4 ते 5 खासदार ठाकरे गटात येण्यासाठी रडत आहेत, मुख्यमंत्र्यांचेही डोळे पाणावलेत"

अमरावती लोकसभा मतदारसंघातील बहुचर्चित आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांचे संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ४२ टक्के वाढ झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नवनीत राणा यांनी भाजपचे तिकीट घोषित केले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे दिनेश बूब हे निवडणूक लढवित आहेत. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञापत्रात त्‍यांच्‍या संपत्तीचे विवरण देण्‍यात आले आहे. 2019 च्‍या निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्‍थावर मालमत्ता मिळून एकूण संपत्ती ही 11 कोटी 20 लाख इतकी होती. ती आता 15 कोटी 89 लाख इतकी झाली आहे. रवी राणा यांच्‍याकडे जंगम आणि स्‍थावर मिळून 7 कोटी 48 लाख इतकी संपत्ती आहे. 2019 मध्‍ये त्‍यांच्‍याकडे 1 कोटी 51 लाख इतकी संपत्ती होती. रवी राणांच्‍या एकूण संपत्तीत 79 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. नवनीत राणा यांच्‍याकडे टोयॅटो फॉर्च्‍युनर कार आहे. रवी राणांकडे स्‍कॉर्पिओ क्‍लासिक आणि एमजी ग्‍लॅस्‍टोर कार ही वाहने आहेत. नवनीत राणांकडे 55 लाख रुपयांचे सोन्‍या-चांदीचे दागिने आहेत. नवनीत राणा यांचे कर्जासह एकूण दायित्‍व 7 कोटी रुपये, तर रवी राणा यांचे दायित्‍व हे 3 कोटी रुपये आहे.

लोकशाहीमध्ये उमेदवार किती शिकला आहे. याला कुठे ही महत्त्व नाही. तो शिक्षित असावा अशी ही अट नाही. त्यामुळे अगदी अंगठा बहाद्दर का उमेदवार असे ना, तोदेखील निवडणूक लढू शकतो. अशा वेळी अमरावतीच्या खासदार आणि भाजपच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवार नवनीत राणा या किती शिकल्या आहेत. याचा मात्र नेमका तपशील हाती येत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरून राजकीय आरोप - प्रत्यारोप पुढील काळात झाले तर आश्चर्य वाटू नयेत, अशीच काय ती स्थिती आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना भाजपचे लोकसभेची उमेदवारी भाजपने जाहीर केली होती. भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी मुंबईतील कार्तिका हायस्‍कूलमधून इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षण पंजाब येथे घेतल्‍याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे, पण त्‍याचा तपशील मात्र दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पंजाबमध्ये काय शिक्षण घेतले, याची माहिती मात्र प्रतिज्ञापत्रात नमूद नाही. प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे प्रमाणपत्र, पदविका, पदवी पाठ्यक्रम याचे पूर्ण नाव नमूद करणे अपेक्षित होते. पण, त्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे नवनीत राणा प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार केवळ दहावी (SSC) उत्तीर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

R

Navneet Rana
Nana Patole News: चव्हाण आता काँग्रेसमध्ये नाहीत, त्यावर चर्चा नको : पटोले; जागावाटपाच्या घोळाला चव्हाणच जबाबदार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com