MLC Election Result 2026: भाजप खासदाराची बहीण, आमदाराचे मेहुणे मतमोजणीतून बाद; शिवसेनेच्या सरनाईकांची आघाडी कायम!

Amravati Teachers Constituency Election: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत २६ उमेदवारांपैकी आतापर्यंत २० उमेदवार बाद झाले आहेत. आता उर्वरित सहा उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी केली जाणार आहे
Amravati Teacher Constituency
Amravati Teacher ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महायुतीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे बोंडे आणि भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर हे मतमोजणी प्रक्रियेतून बाद झाले आहेत. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

किरण सरनाईक ३,९४२ मतांनी आघाडीवर

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत २६ उमेदवारांपैकी आतापर्यंत २० उमेदवार बाद झाले आहेत. आता उर्वरित सहा उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर निवडणुकीतील अंतिम निकालाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Amravati Teacher Constituency
Drought Relief Subsidy 2026: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत! कोणाला पैसे मिळणार, कोण वंचित राहणार; निकष काय?

मतमोजणीच्या २० व्या बाद फेरीनंतरच्या आकडेवारीनुसार, किरण सरनाईक यांना ९ हजार ७२२ मते मिळाली आहेत. त्यांच्या तुलनेत अदिती पोहरे यांना ५ हजार ७८०, तर श्रीकांत देशपांडे यांना ५ हजार ६०५ मते मिळाली आहेत. या आकडेवारीनुसार सरनाईक यांनी अदिती पोहरे यांच्यावर ३ हजार ९४२ मतांची आघाडी घेतली आहे.

Amravati Teacher Constituency
MLC Election Result: विधान परिषद निवडणुकीत भाजपला धक्का! शिक्षक मतदारसंघात पराभव; वाराणसीचा गड सपानं जिंकला

दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे लक्ष

मतमोजणीच्या प्रक्रियेत अनेक उमेदवार बाद झाल्याने आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उर्वरित सहा उमेदवारांना मिळालेल्या पसंतीक्रमाच्या मतांमुळे आघाडीचे गणित बदलणार का, याची उत्सुकता आहे.

Amravati Teacher Constituency
Maharashtra Scholarship Exam 2027: चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! परीक्षा कधी? अर्जाची अंतिम मुदत काय?

भाजप खासदाराची बहीण आणि भाजप आमदाराचे मेहुणे मतमोजणीच्या प्रक्रियेतून बाहेर पडल्याने या निवडणुकीची चर्चा अधिक रंगली आहे. मात्र, अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत कोणत्याही उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेले नाही. आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीनंतर अमरावती शिक्षक मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com