मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) सध्या कुठे आहे. हा प्रश्न विचारला जात आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याच विषयावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी खोचक टीका आघाडी सरकारवर (Thackeray government) केली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
अमृता फडणवीस यांनी ठाकरे सराकारवर जोरदार टीका केली आहे. ''एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’' असे त्या माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाल्या. अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना अमृता फडणवीस यांनी लक्ष्य केले.
''अनिल देशमुख आणि परमबीर सिंग हे तपासात सहकार्य करत नाहीत. यंत्रणांपुढे हजर होत नाहीत, त्याबाबत काय सांगाल, असे पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस म्हणाल्या, ''त्यांना मस्ती आली आहे. त्यांचं कुठे हनीमून चाललं आहे आपल्याला माहीत नाही पण त्यांना शोधून काढलं पाहिजे,''
देशात शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईतील सी. पी. टँक रोडवरील माधव बाग मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होत्या. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ''आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहोत आणि काहीही चुकीचं घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. शिवसेनेचे मुखपत्र सामनावरही त्यांनी टीका केली. ते भाजपवरच टीका करणार. जर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसुली सरकार कसे चालणार?''असा टोला फडणवीसांनी लगावला.
''महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत. त्याबाबत विचारले असता, तुम्ही तशी कामं करताय म्हणून तुमच्यावर आरोप होत आहेत. तुम्ही भजनं म्हणताय म्हणून तर आरोप केले नाहीत ना? तुम्ही जलयुक्त शिवारसारख्या योजनेवर जर आरोप करू शकता तर आम्ही जे समोर दिसतंय त्यावर आरोप करायचा नाही का? 'असा सवाल अमृता फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं आहे. त्या म्हणाल्या की, लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जायला पाहिजे की ड्रग्स कॅपिटल बनवायचे हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज आहे.
अमृता फडणवीस यांनी सामनामधून होणाऱ्या टीकेलाही खोचक उत्तर दिलं आहे. सामना टीका कुणावर करणार? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असाही प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.