Anandraj Ambedkar Vs Ramdas Athawale : आठवलेंवर टीका करताना आंबेडकरांची जीभ घसरली; म्हणाले, 'गोठ्यामध्ये गाई, म्हशी बांधल्या जातात *** नाही'

Anandraj Ambedkar Criticizes Ramdas Athawale in Jalna : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर प्रतिक्रिया देताना रिपल्बिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची जीभ घसरली.
Ramdas Athawale And Anandraj Ambedkar
Ramdas Athawale And Anandraj Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Dalit politics Maharashtra : रिपल्बिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका करताना, जीभ घसरली आहे. "आठवले हे काही आंबेडकर कुटुंबातील नाहीत. यामुळे त्यांच्याबरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. माझं असं म्हणणं आहे की, गोठ्यामध्ये गाई, म्हशी बांधल्या जातात *** नाही", अशी जहरी टीका त्यांनी केलीय. आनंदराज यांच्या या टीकेवर आठवले यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

राज्यातील ठाकरे आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत आहेत, त्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. आनंदराज आंबेडकर यांनी आठवलेंच्या या प्रतिक्रियेवर टीका करत असताना, जीभ घसरली आहे.

आनंदराज आंबेडकर म्हणाले, "पवार (Sharad Pawar) अन् ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे. आठवले हे काही आंबेडकर कुटुंबातील नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर बोलण्याची गरज असे म्हणत आनंदराज यांनी आंबेडकर बंधू एकत्र येण्यावर सूचक संकेत दिले. हो, राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या शक्यता असतात. त्यामुळे राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale And Anandraj Ambedkar
Ramdas Athawale on Thackeray brothers : ''ठाकरे बंधूंना शुभेच्छा, आता..'' ; आठवलेंचं सूचक विधान अन् नव्या चर्चांना उधाण!

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतीय लष्करानं राबवलेल्या सिंदूर ऑपरेशनवर बोलताना, 'पाकिस्तान गुडघ्यावर असताना युद्ध थांबवणे अत्यंत दुर्दैवी निर्णय होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा सरकारवर प्रेशर का होता, हे काही कळायला मार्ग नाही. आपल्या देशाला पन्नास वर्षांपासून सतत दहशतवादाचा हल्ले होत आहे. निरपराध नागरिकांची हत्या होत आहे. आमच्या माता भगिनींचा सिंदूर पुसल्या जात आहे. आजची पाकिस्तानची परिस्थिती अनिश्चित असताना, ही अत्यंत योग्य वेळ होती. अचानक युद्धबंदी करणे हे न कळलेलं कोड आहे. एकदाच सोक्षमोक्ष लावावा', असे आनंदराज यांनी म्हटले.

Ramdas Athawale And Anandraj Ambedkar
Ramdas Athawale On Vanchit Bahujan Aghadi: वंचित आघाडी पक्ष बंद करा, रिपब्लिकन पक्षात या, माझे मंत्रीपदही घ्या! आठवलेंकडून पुन्हा ऐक्याची हाक

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. 'हे अत्यंत दुर्देवी आहे. एससी, एसटीचे पैसे अशाप्रकारे वळते करत असतील, तर हा खरं म्हणजे ॲट्रॉसिटीचा गुन्हा होऊ शकतो. जवळपास साडेसात हजार कोटी वळवण्यात आले आहे', असेही आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com