Anjali Damania : हत्याकांडांचा 'सिलसिला' सुरूच; दमानियांचा सवाल, 'बीडचे पालकमंत्री कुठं आहेत?'

Anjali Damania on Beed : बीडमधील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. रोज कोणता ना कोणता मारहानीचा व्हिडिओ समोर येत आहे. आताही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील एका तरणाची हत्या झालाचा दावा केला आहे.
anjali damania
anjali damaniaSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्य हादरलं होते. या घडनेचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले होते. यानंतर त्यांनी आणखी अशी एक घटना बीड जिल्ह्यात घडल्याचा दावा करताना तरूणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 96 दिवस होत असून घटनेची शंभराव्या दिवसारकडे वाटचाल सुरू आहे. पण अद्याप या हत्याप्रकरणातील एक गुन्हेगार फरार असून त्याचा शोध पोलिसांना लागेला नाही. याचदरम्यान आता खोक्याभाई सारख्या गुंडांनी केलेल्या मारहानीचे व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान आता एका नव्या व्हिडीओवरून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती बीडमध्ये झाल्याचा दावा केला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना येथे घडली असून एका 23-24 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका आरोग्य केंद्रात टाकण्यात आला. याच घटनेवरून दमानिया यांनी, बीडमध्ये चाललंय तरी काय? असा उद्विग्न सवाल करताना पालकमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा केलीय. सध्या बीडमध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, ते थांबले पाहिजेत असेही आवाहन त्यांनी केलं आहे.

जिल्ह्यातील एकापाठोपाठ समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवरून दमानिया यांनी राजकीय गुन्हेगारीवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहेत. यामुळे यावर काय बोलावं हेच सूचत नाही. बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना घडली असून जी मन हलवून टाकणारी असल्याचे म्हटलं आहे. ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. जसे एखाद्या चित्रपटातील सिन असावा किंवा जसे संतोष देशमुख यांच्याबरोबर झाले तसेच त्या तरूणाबरोबर झाले असावे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

यावेळी दमानिया यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना पालकमंत्री काय करतायत? असा सवाल केला आहे. तर अशा प्रकरणात ज्यांचे जीव गेले आहेत त्यांचे नाव तरी त्यांना माहित आहेत का? याबाबत पालकमंत्र्यांनी कोणते निर्देश तरी दिले आहेत का? असा सवाल केला आहे. तसेच येथे कोणालाच काम करण्याचे दिसत नसून एकदा अजितदादा जाऊन आले. पण त्यानंतर त्यांचा चकार शब्दही ऐकलेला नाही, अशी टीका दमानियांनी केली आहे.

आता बीडमध्ये सगळं हाताबाहेर गेलं असून येथली सगळी सिस्टिम सडलेली आहे. ती सगळीच सिस्टिम बदला, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच या तिसऱ्या प्रकरणातही वाल्मिक कराडचे साथीदार असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो आधीचे जयदत्त क्षीरसागर असो हे सगळेच शरद पवारांच्या तालमीत तयार झाले आहेत. फक्त पंकजा मुंडे यात नव्हत्या असाही हल्लाबोल दमानिया यांनी केलाय.

तसेच यावेळी दमानिया यांनी शरद पवार यांच्या बीडच्या स्थितीवर केलेल्या वक्तव्यावर टोला लगावला आहे. आता शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे. पण येथे धुमाकूळ घालणाऱ्या सगळ्या लोकांना मोठं करण्यामागे पवारांचा हात असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com