Maharashtra News : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांना ईडीची कोठडी मिळू शकते, अशी शक्यता आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेबाबत समाजसुधारक आणि केजरीवाल यांचे एकेकाळचे गुरु अण्णा हजारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही, याचे मला वाईट वाटते असे आण्णा हजारे म्हणाले. (Latest Marathi News)
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर मी केजरीवाल यांना नवीन दारू धोरणाबाबत दोनदा पत्रे लिहिली होती. त्याने माझे ऐकले नाही, याचे मला वाईट वाटते आणि आता त्यांना अटक झाली याबद्दल मला वाईट वाटते. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा माझ्या आंदोलनात सामील झाले होते, तेव्हा मी त्यांना नेहमी देशाच्या हितासाठी काम करण्यास सांगितले होते. पण त्यांनी हे लक्षात ठेवले नाही, मात्र आता मी त्यांना कसलाही सल्ला देणार नाही, असे हजारे (Anna Hajare) म्हणाले.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पुढील सहा दिवस केजरीवला ईडी कोठडीच्या मुक्कामात असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.