नाना पटोलेंनी मित्रांकडे जबाबदारी दिली अन्‌ काँग्रेसमध्ये वादळ उठले!

काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती; सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा
Atul Londhe_Sachin Sawant
Atul Londhe_Sachin Sawant Sarkarnama

मुंबई : राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघटना मजबूत करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी आज (ता. १९ ऑक्टोबर) जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. पक्षाचे विद्यमान प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावर मुख्य प्रवक्तेपदाची, तर डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग आणि सेलच्या प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. पटोले यांनी ही दोन्ही पदे आपल्या विश्वासातील आणि विदर्भातील नेत्यांकडे सोपवली आहेत. (Appointment of Atul Londhe as the Chief Spokesperson of the Congress; Sachin Sawant resigns)

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वादळ उठले आहे. मीडिया विभागाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सावंत यांनी हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मागील १० वर्ष सचिन सावंत पक्षाचे मीडिया इंचार्ज म्हणून काम केले आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना डावलण्यात आलं आहे. त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

Atul Londhe_Sachin Sawant
धमकीच्या पत्रानंतर अशोक पवारांना अजितदादांचा फोन...

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या कामात सुसुत्रता आणि वेग यावा, यासाठी काँग्रेसच्या विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. यामध्ये माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. माध्यम आणि संवाद विभाग, तसेच मुख्य प्रवक्तेपद हे लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या समितीत सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश करण्यात आलेला आहे.

Atul Londhe_Sachin Sawant
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा राहणार

प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विशाल मुत्तेमवार यांच्याकडे सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस दिला आहे. माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांची नियुक्ती आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे या विभागाचे सहप्रमुख असतील. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अभिजीत वंजारी हे सहप्रमुख, तर प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दीप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी ही प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी यांच्याकडे देण्यात आली आहे. समितीचे सहप्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यावर प्रशिक्षण विभाग सोपविला आहे. त्यांना सहप्रमुख, शाम उमाळकर, संजय बालगुडे म्हणून, तर सदस्य म्हणून डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके हे मदत करतील.

Atul Londhe_Sachin Sawant
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदाची धुरा माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यांना सहप्रमुख म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्य म्हणून सूर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे हे सहकार्य करतील. बूथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com