Ashok Kharat New Crime: अशोक खरातचं आणखी एक धक्कादायक कांड समोर, 'ब्लॅकमेल' करणाऱ्या 'ऑफिस बॉय'ला अडकवण्यासाठी रचला होता खतरनाक 'प्लॅन'

Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातला त्याच्या अटकेची तीन दिवस आधीच कुणकुण लागली होती. याचमुळे अटकेच्या तीन दिवस आधी अवघ्या तीन दिवस आधी खरातनं शिर्डीत राज्यातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat Neeraj Jadhav .jpg
Ashok Kharat Neeraj Jadhav .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातला याला नाशिकमधील सरकारवा़डा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची एसआयटीमार्फत कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान, स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातचं आणखी एक भयानक कांड समोर आलं आहे. खरातनं त्याच्यासह पीडित महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या नीरज जाधवला अडकवण्यासाठी मोठा प्लॅन रचल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.

आरोपी अशोक खरात यानं शिर्डीतील एका पीडित महिलेलाच हाताशी धरत ऑफिसबॉय नीरज जाधवविरोधात पोलिसांत खोटी फिर्याद दाखल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांना संबंधित महिलेने नीरज जाधव विरोधात दिलेल्या फिर्यादीत अनेक विसंगती असल्याचं समोर आल्यानंतर तपासाचा अँगल बदलला. यानंतर समोर आलेल्या माहितीनं पोलिसही काहीवेळ चक्रावून गेले. कारण नीरज जाधवला अडकवण्यासाठी खरातनेच हा सर्व प्रकार केल्याचं समोर आलं.

धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान, अशोक खरातचा संबंधित पीडित महिलेच्या कुटुंबासोबत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. हे सर्व हादरवणारं खरातचं कांड समोर आणण्यात अहिल्यानगर पोलिसांना मोठं यश आलं आहे.

पण पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक खरातनं संबंधित महिलेला हाताशी धरुन नीरज जाधवविरोधात टाकलेला डाव त्याच्यावरच उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. भोंदूबाबाने अनेक महिलांवर अत्याचार करत त्यांच्या विश्वास,श्रध्देला तडा दिल्याचं पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारींवरुन समोर येत आहे. खरात आणि नीरज जाधवच्या अटकेनंतर अनेक नेत्यांची नावं या प्रकरणात समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Neeraj Jadhav .jpg
Nagpur BJP MLA: आधी तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करुन खळबळ उडवली; पण गडकरी-फडणवीसांच्या 'लाडक्या' आमदारानं 2 महिन्यांतच भूमिका बदलली

शिर्डीत एका तरुणीनं 12 मार्च रोजी अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकी प्रकरणात अशोक खरातचा ऑफिसबॉय असलेल्या नीरज जाधवविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपी नीरजने खरात आणि तरुणीचे काही आक्षेपार्ह फोटो काढल्याचंही समोर आलं आहे. ते फोटो पाठवून तो तरुणीला ब्लॅकमेल करत होता.

या प्रकाराची माहिती खरातला पीडितेनं दिल्यानंतर खरातनं तिला तुझ्या तू बघून घे म्हणत जाधव विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचाही सल्लाही दिल्याचं समोर आलं होतं.यानंतर याप्रकरणी पीडित तरुणीनं शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Ashok Kharat Neeraj Jadhav .jpg
Women Commission Maharashtra: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'या' चार नावांची चर्चा?घडामोडींना वेग

नाशिकच्या पोलीस क्लबमध्ये गेल्या सहा तासांपासून SITच्या टीमकडून अशोक खरातची प्रत्यक्ष चौकशी सुरु आहे. खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव आणि खरातची समोरासमोर चौकशी केली जात आहे. या चौकशीतला धक्कादायक तपशील आता समोर आला आहे. या चौकशीदरम्यान,जाधव आणि खरात यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातला त्याच्या अटकेची तीन दिवस आधीच कुणकुण लागली होती. याचमुळे अटकेच्या तीन दिवस आधी अवघ्या तीन दिवस आधी खरातनं शिर्डीत राज्यातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. एका ‘विनोद’ नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्थीतून संबंधित भेट पार पडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com