Asim Sarode News: मुख्यमंत्री शिंदेंसह 16 जण अपात्र ठरले तर उर्वरित आमदारही...; सरोदेंनी वर्तवल्या 'या' चार शक्यता !

Thackeray Vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या ११ किंवा १२ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ....
Asim Sarode News
Asim Sarode NewsSarkarnama
Published on
Updated on

प्राची कुलकर्णी-

Maharashtra Political News: राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पू्र्ण झाली आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात निकाल येण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावाही ठोकला जात आहे. याचवेळी ॲड. असीम सरोदे(Asim Sarode) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चार शक्यता वर्तवल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना(Shivsena) नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता. याचमुळे आता राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे.विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार ठरुन शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा आहे. याचदरम्यान, कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत टि्वटद्वारे मोठं विधान केलं आहे.

Asim Sarode News
Akkalkot News : स्वामी समर्थ साखर कारखाना; चेअरमनपदी संजीव पाटलांची बिनविरोध निवड !

असीम सरोदे काय म्हणाले ?

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी येत्या ११ किंवा १२ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येईल असा दावा केला आहे. तसेच न्यायालय आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणं सोपा निर्णय म्हणून अवलंबला जाऊ शकतो. दुसरी शक्यता म्हणजे बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.

Asim Sarode News
Fake Educational Certificate Scam: नापासांना केलं पास,दहावी-बारावीची बनावट सर्टिफिकेट केली तयार; बोर्डाची खोटी वेबसाईटही बनवली

सरोदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट न्यायालयच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते. यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते अशी तिसरी शक्यता वर्तवली आहे. तसेच चौथी शक्यता असीम सरोदेंनी मोठ्या घटनापीठाची वर्तवली आहे. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते असं आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com