Raj Thackeray: राज ठाकरेंनी डिवचले, तर आठवलेंनी खणकावले

Mahayuti Alliance Internal Conflicts: महायुतीमधील आरपीआयचे मंत्री रामदास आठवले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शाब्दिक युद्धाला तोंड फुटले आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने शाब्दिक युद्धांना तोंड फुटले आहे. कोण काय बोलेल अन् त्याचा कोठे धमाका होईल, याचा नेम राहिलेला नाही.

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मनसे पक्षाची भूमिका सांगताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष मंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला. यावर मंत्री आठवले यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. आता या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.

मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ज्यांना आमचा पाठिंबा असतो, त्यालाच सत्ता मिळाली आहे, असे म्हटले होते. त्यावर राज ठाकरे यांनी मंत्री आठवले यांना यांच्यासारखे मंत्री होण्यापेक्षा पक्ष संपवणे चांगले, असा टोला लगावला होता.

राज ठाकरे यांच्या या टोलेबाजीवर मंत्री आठवले यांनी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील सुनावले आहे. 'अमित ठाकरे यांची माहिममधून निवडणूक लढवण्याची एकमेव पात्रता म्हणजे, ते राज ठाकरेंचा मुलगा आहे', असा टोला लगावला आहे.

Ramdas Athawale
Nawab Malik : 'मला काहींनी विधानसभेत देशद्रोही म्हटले, आता मात्र...'; नवाब मलिकांचा सूचक इशारा

दोघांमध्ये सुरू झालेल्या या टोलेबाजीवर मंत्री रामदास आठवले म्हणाले, "माझ्याविषयी राज ठाकरे ज्याप्रकारे विधानं करत आहेत, ते योग्य नाही. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. जागा जिंकण्यात मनसेला फारसे यश मिळालेले नाही. तरी देखील महाराष्ट्रात मनसेची चांगली पकड आहे. काँग्रेससोबत (Congress) असतानाही मला मंत्रिपद मिळाले होते.

भाजप-शिवसेनेसोबतची सत्ता आल्यावर देखील मंत्रिपद मिळाले". माझी शक्ती लहान असेल, पण कोणाला पाठिंबा द्यायचा हे न निवडण्याची ताकद माझ्याकडे आहे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale
Eknath Shinde यांच्या भाषणात टोले, टोमणे आणि चिमटेही | vidhan Sabha | Ajit Pawar | Devendra Fadnavis

'मुंबईतील माहिमच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणारे आमदार सदा सरवणकर तगडे उमेदवार आहेत', असे आठवले यांनी पूर्वी म्हटले होते. या जागेवर भाजपने राज ठाकरे यांच्या मुलाला पाठिंबा दिला असला, तरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची अमित ठाकरेंसमोर उपस्थिती चर्चेचा विषय बनला आहे. 'उमेदवारांना नावे मागे घेण्याची अंतिम तारीख उद्या 4 नोव्हेंबर आहे. त्यावेळी माहिममधील लढतीचे चित्र स्पष्ट होईल', असे सांगून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com