Nawab Malik : 'मला काहींनी विधानसभेत देशद्रोही म्हटले, आता मात्र...'; नवाब मलिकांचा सूचक इशारा

NCP candidate MLA Nawab Malik of Mankhurd Constituency in Mumbai issued a warning to the opposition on sedition charges : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी देशद्रोहाच्या मुद्यावर पहिल्यांदा विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी देशद्रोहाच्या मुद्द्यावर सूचक विधान करत विरोधकांना इशारा दिला आहे.

"मला विधानसभेत देशद्रोही म्हटले गेले. यातून माझी प्रतिमा मलिन केली गेली. माझ्या विरोधात अनेक अफवा पसरवल्या गेल्यात. दहशतवाद्यांशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अनेक गोष्टी रचून त्या पसरवल्या गेल्या. आजही काही सांगितल्या जात आहेत. परंतु आता यासर्वांना आपण कायद्याने उत्तर देवू", असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना भाजपचा (BJP) विरोध होता. त्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही, याकडे लक्ष लागलं होतं. परंतु अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात नवाब मलिक यांची उमेदवारी जाहीर करत भाजपच्या विरोधावर मात केली. 

Nawab Malik
Chandrashekhar Bawankule: फडणवीसांना कुणाची भीती? राऊतांच्या प्रश्नावरुन बावनकुळेंना झाली 'शोले'मधील असरानींची आठवण

नवाब मलिक पुन्हा आमदारकीसाठी नशीब आजमावत आहेत. परंतु त्यांच्यावर दहशतवाद्यांशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोप आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक मंत्री होते. सरकार कोसळून महायुती सरकार आले. त्यावेळी मंत्री नवाब मलिक तुरुंगात होते. नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा अजित पवार राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडले होते. त्यामुळे नवाब मलिक हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संपर्कात राहतात की, अजित पवार यांच्या संपर्कात राहतात, याची उत्सुकता होती.

Nawab Malik
Arvind Sawant : ...हा तर माझा अपमान; गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांचा पलटवार

फडणवीसांचे पत्र

नवाब मलिक यांनी अजित पवार यांची साथ केली. याचदरम्यान, नागपूर अधिवेशन काळात, भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दहशतवाद्यांशी संबंध असलेले अन् देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर नकोत, असे पत्र लिहिले. हे पत्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते.

अजितदादांच्या मुंबईतील रॅलीत सहभाग

नवाब मलिक तेव्हापासून अलिप्त होते. परंतु ते अजित पवार यांच्या संपर्कात होते. अजित पवार मुंबईत जनसन्मान रॅली घेऊन पोचले असता, त्यात नबाब मलिक सहभागी झाले होते. यावर भाजप आणि महाविकास आघाडीतून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. आता अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. 

मलिक नेमकं काय म्हणाले...

नवाब मलिक आता प्रचारामध्ये सक्रिय झालेत. परंतु त्यांच्यावर असलेल्या देशद्रोहाच्या आरोपाची त्यांना सामना करावा लागत आहे. यावरून त्यांनी विरोधकांना सूचक, असा इशारा दिला आहे. "मला विधानसभेत देखील काही लोकांनी देशद्रोही म्हटले. परंतु मी एकालाही आतापर्यंत उत्तर दिलेले नाही. कारण न्यायालयाने मला बोलण्यास परवानगी दिली नव्हती. या काळात माझी प्रतिमा मलिन करण्यात आली. आता मात्र माझ्याविरोधात खोट्या अफवा किंवा आरोप करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर मार्गाने लढाई लढेल". जे माझ्यावर चुकीचे आरोप करतील किंवा माझ्याविषयी अफवा पसरवतील, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढाई लढेल, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com