RSS Plans for BJP: भाजपसाठी RSS महाराष्ट्राच्या मैदानात, हरियाणापेक्षा वेगळी रणनीती; 'मविआ'ची कोंडी होणार?

Maharashtra Vidhan Sabha Election: भाजप महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हरियाणापेक्षा वेगळी रणनीती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलं आहे.
RSS & BJP
RSS & BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीचा घमासान सुरू आहे. विजयाचे महायुती आणि महाविकास आघाडीकडून दावे केले जात आहे. लोकसभा निडवणुकीत प्रचारापासून लांब राहिलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळी महाराष्ट्रात भाजपसाठी मैदानात उतरला आहे.

मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले असतानाच, संघाकडून विशेष बूथ शक्तीकरणाची तयारी केली गेली आहे. संघाने या उतरलेल्या दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) महाराष्ट्रात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार प्रातांत प्रचाराची रणनीती आखली आहे. यात सर्वाधिक जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांची असणार आहे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्याकडे दोन विधानसभांची जबाबदारी असणार आहे.

RSS & BJP
Ashish Shelar: घाबरायचे कारण काय? शेलारांनी ठाकरेंना करून दिल्या जुन्या घटनांच्या आठवणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या रणनितीत विभागातील वेगवेगळ्या प्रमुखांना वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. विभागातील दोन पदाधिकाऱ्यांना एका विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक विधानसभेत संघाचे तीन पदाधिकारी उपस्थित राहून काम मतदारपर्यंत (Voter) पोचण्याचे नियोजन असणार आहे. हे तिन्ही पदाधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी समन्वयक साधण्यासाठी रणनीती, तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचे काम करतील.

RSS & BJP
Uddhav Thackeray : 'अदानींसाठी जमिनी शोधत होते, केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गचं चांगलं होईल'; ठाकरेंचा घणाघात

बूथ रचनेवर सर्वाधिक लक्ष संघाच्या नेमलेल्या पदाधिकाऱ्यांचे असणार आहे. बूथ चार गटात विभागाले आहे. याला 'अबकड', अशी विभागणी केली आहे. 'अ' आणि 'ब'मध्ये बूथ सकारात्मक ठेवून तिथं, 100 टक्के मतदान घडवून आणण्याचे नियोजन संघाने केले आहे. तसेस भाजपशिवाय प्रत्येक बूथवर दोन टीम मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे काम करतील. 'क' गटात इथं पूर्वीपेक्षा जास्त दहा ते पंधरा टक्के मते वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तर नकारात्मक झोनमध्ये 'ड' गटासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतदानावर संघाकडून काही निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. याचा अभ्यास करून लोकसभेत जैन आणि मारवाडी मतदारांनी नोटा मतदानावर अधिक भर दिल्याचे संघाच्या निरीक्षणात समोर आले. यावेळी तसं होऊ नये म्हणून या दोन्ही समाजातील प्रमुख लोकांच्या गाठीभेटीवर लक्ष असणार आहे. जातीय राजकारणाला गती मिळू नये, यासाठी संघ विशेष काळजी घेताना दिसतो आहे. यामुळे संघाने विविध जाती-समुदायातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.

हरियाणात काँग्रेसचे सरकार येणार असे भाकीत होते. परंतु तिथं धक्कादायक निकाल लागला अन् भाजप विजयी झाला. यामागे संघाचे सूक्ष्म नियोजन असल्याचे मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बूथ स्तरावर 50-50 युवा परिषदा आणि महिला माता परिषदा आयोजित करत आहे. परंतु हरियाणाची महाराष्ट्राशी तुलना करणे योग्य ठरणार नाही, असे संघ म्हणतो.

महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य आहे आणि इथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे संघाने इथं वेगळ्या पद्धतीने जनजागृतीवर भर दिला आहे. यात वेगवेगळ्या रणनीतीचे आखण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com