Ashish Shelar: घाबरायचे कारण काय? शेलारांनी ठाकरेंना करून दिल्या जुन्या घटनांच्या आठवणी

Ashish Shelar on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणीचा व्हिडिओवर भाजप नेते आशिष शेलार यांची जुन्या आठवण करून देणारी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली.
Ashish Shelar | Uddhav Thackeray
Ashish Shelar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वणी दौरा गाजत आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी झाली. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः काढून रिलीज केला. यावरून राज्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले.

उद्धव ठाकरे यांच्या संयमाचे कौतुक राजकीय विश्लेषक करत असतानाच विरोधकांनी मात्र त्यावर कोपरखळ्या लगावल्या आहेत. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी घाबरायचे कारण काय? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांना जुन्या आठवणी करून देत टोमणे लगावले आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः व्हिडिओ काढला आहे. त्यांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी झालेली प्रश्नोत्तर देखील चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांकडे माझी जशी बॅगांची तपासणी केली, तशी मोदी, शाह आणि शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली का असा प्रश्न केला. या तिघांच्या बॅगांची तपासणी केलेला मला व्हिडिओ पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी हजरजबाबीपणा दाखवत, करणार आणि व्हिडिओ पाठवणार सर, असे सांगितले.

Ashish Shelar | Uddhav Thackeray
Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

उद्धव ठाकरे यांनी बॅगांच्या तपासणीवर काहीसा संताप व्यक्त केला. हे वृत्त समोर येताच, उद्धव ठाकरे यांच्या संयमाचे राजकीय विश्लेषकांनी कौतुक केले. परंतु विरोधकांनी कोपरखळ्या मारल्या. भाजप (BJP) नेते आशिष शेलार यांनी घाबरायचे कारण काय? असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जुन्या घटनांची आठवण करून दिली. आशिष शेलार यांनी याबाबत एक्स खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

Ashish Shelar | Uddhav Thackeray
Mallikarjun Kharge : भाजपवाल्यांना पुन्हा प्राथमिक शाळेत पाठवा; संविधानला कोरं पुस्तक म्हटल्यावरून मल्लिकार्जुन खरगे संतापले

घाबरायचे कारण काय?, असे म्हणत आशिष शेलार यांनी जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती, केंद्रीय मंत्र्यांना अटक.., असे म्हणत माजी मंत्री नारायण राणेंचा संदर्भ दिला. कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत.., कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर, कुणाचे फोडले डोळे.., मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे.., अशा जुन्या घटनांना उजाळा देत टोलेबाजी करणारी पोस्ट एक्स खात्यावर शेअर केली आहे.

'काल त्यांचे नुसते हेलिकॉप्टर तपासले म्हणून केवढे झाले ओले, असा टोला लगावत युतीच्या मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी तपासले होते हेलिकॉप्टर तीच यंत्रणा वागली तुमच्याशी ही कायद्याने समान! मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय? लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय!', असेही शेलार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com