Uddhav Thackeray : 'अदानींसाठी जमिनी शोधत होते, केसरकर पडल्यानंतरच सिंधुदुर्गचं चांगलं होईल'; ठाकरेंचा घणाघात

ShivSena chief Uddhav Thackeray criticized Deepak Kesarkar Sawantwadi Sindhudurg : उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी इथल्या सभेतून दीपक केसरकर, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका.
Uddhav Thackeray 2
Uddhav Thackeray 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोकणातील सावंतवाडी इथल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

"महाराजांचा पुतळा पडून काहीच चांगलं झालं नाही, पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गच चांगल होईल, असे घणाघात करताना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेवर अदानींच्या गोल्फ कोर्ससाठी जमीन शोधत होता", असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला. मी कोकणाचे अदानीकरण होऊ देणार नाही, असा देखील इशारा ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सिंधुदुर्ग इथल्या सावंतवाडी प्रचार सभा झाली. तत्पूर्वी त्यांचा ताफा निवडणूक आयोगाने अडवला. यातून ते चांगलेच संतापले होते. सलग तिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या पथकांकडून त्यांची तपासणी झाली. यावरून खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग सरकारसाठी एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप केला.

Uddhav Thackeray 2
Ashish Shelar: घाबरायचे कारण काय? शेलारांनी ठाकरेंना करून दिल्या जुन्या घटनांच्या आठवणी

उद्धव ठाकरे यांनी या सभेतून दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधताना खाली मुंडी पाताळ धुंडी, याप्रमाणे सतत खाली मान घालून बोलणारे, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला (Shirdi) जाणारे, तिथं हात जोडणारे, पण मनी नाही भाव देवा मला पाव, असे म्हणणारे, पण यांन देव पावणार कसा? असा टोले केसरकर यांना लगावले. साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या मंत्रानुसार यांच्यात एकही गुण नाही. घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. छत्रपती महाराज ईव्हीएम मशीन नाही. आजपर्यंत 350 वर्षे झाली. सिंधुदुर्ग किल्ला जशाचा तशा उभा आहे. पण यांनी उभारलेला पुतळा पडला, याकडे ठाकरेंनी लक्ष वेधले.

Uddhav Thackeray 2
Nawab Malik : माझ्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या, त्यातून जामीन रद्दचे कटकारस्थान रचले; मलिकांचा रोख कोणाकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंधे, असा उल्लेख करत, ठाकरे म्हणाले, "मिंधे म्हणताय, काय करणार, वारे एवढे जोरात होते की, वाऱ्यानं पुतळा पडला. लाज वाटली पाहिजे, तुम्हाला स्वतः राज्यकर्ते म्हणून घ्यायला. इथंले आमदार (दीपक केसरकर) म्हणतात की, वाईटातून चांगलं होतं. महाराज पुतळा पडला, त्यातून काय चांगल होणार असेल". ही र्दुबुद्धी म्हणजे डोक्यात मेंदू आहे की, कचरा आहे. महाराजांचा पुतळा पडला त्यातून काही चांगल होणार नाही, परंतु केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गमधून चांगल होईल, असे टोला ठाकरेंनी लगावला.

केसरकर आणि त्यांचा मित्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवर जागा शोधण्यासाठी फिरत होते, अशी माझ्याकडे माहिती आहे. ही जमीन सिंधुदुर्गच्या विकास कामांसाठी शोधत नव्हते, तर अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते. अदानीचे दलाल म्हणतात, सबका मालिक अदानी है. अदानीचे दलाल बनून कोकणात येता, कोकणवासियांना फसवता, मी माझ्या कोकणाचे अदानीकरण होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणार, सरकार आल्यावर अदानीच्या घशात घातलेली मुंबई बाहेर काढणार, तिथं माझ्या गिरणी कामगारांना परवडणारी घरे देईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com