Sanjay Raut : ''मविआ' आजारी नाही, पण 'एक्स-रे' करावा लागणार'; संजय राऊतांना नेमकं काय सुचवायचंय

Sanjay Raut statement increased the ambiguity in MVA : महाविकास आघाडीतील काँग्रेसशी जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना संजय राऊत यांचे सूचक विधानाने अजून संदिग्धता वाढली.
Sanjay Raut 6
Sanjay Raut 6Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा वाद विकोपाला पोचला आहे.

परंतु दोन्ही बाजून तसं काही, असे दाखवलं जात असले, तरी त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. परंतु संजय राऊत यांनी तत्पूर्वी दिलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे.

संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, "'मविआ'ची तब्येत नक्कीच चांगली आहे. तब्येतीविषयी कोणी काय आक्षेप घेण्याचं कारण नाही. तरी 'एक्स-रे', 'एमआरआय' करू आज. आतले काही आजार असतात, ते वरून दिसत नाहीत. त्यामुळे 'एक्स-रे' करावा लागले". 'मातेश्री'वरील बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही निर्णायक भूमिका घेणार का? 'यावर आपण पाहू', एवढीच प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Sanjay Raut 6
Chandrashekhar Bawankule Vs MVA : बावनकुळेंनी टायमिंग साधलं, 'मविआ'त हाणामारी सुरू

'मविआ'मधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेष करून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. हा तिढा एवढा वाढला असून, तो शरद पवारांपर्यंत पोचला आहे. शरद पवार यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे समजले जाते. या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक झाली. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षातील जागा वाटपाचा वाद गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut 6
ShivSenaUBT Meeting : 'मातोश्री'वर बैठक, 'महायुती'पेक्षा 'मविआ'त टेन्शन वाढलं

संजय राऊत यांनी 'मविआ'ची तब्येत ठिक असल्याचे सांगत असले, तरी 'एक्स-रे' आणि 'एमआयआर' करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोठेतरी नाराज असल्याचे दिसत आहे. मविआमध्ये सुरू असलेल्या राजकीय घमासानमध्ये आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच शरद पवार काँग्रेस हायकमांडशी जागा वाटपावरच्या तिढ्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या या दबावतंत्राचे पडसाद महाविकास आघाडीत उमटू लागले आहेत.

आम्ही भोगलं आहे

संजय राऊत म्हणाले, "याशिवाय त्यांनी आम्ही नाराज नाही. काँग्रेसला कळवण्याचा विषयच नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्हाला आमचे निर्णय, पक्षाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहेत. आम्ही नाराजी का, कोणाला कळवायची. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. आम्ही बैठकांना उपस्थित राहतो. आम्हाला महाराष्ट्रातून भाजप आणि त्यांच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे". या लोकांशी टोकाचा संघर्ष आम्ही केलाय. त्याचे परिणाम आम्ही भोगलेत, तुरुंगात गेलो आहोत. आमच्या कुटुंबावरती, मुलांवरती, 'ईडी', 'सीबीआय' यांचे हल्ले झाले. या भ्रष्ट भाजप मंडळाशी आम्ही लढू", असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com