Maha Vikas Aghadi News: नागपूर शहरातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीचे घोडे अडले होते. ही जागा सोडणार नाही, असा इशारा शिवसेनेने (यूबीटी) आणि काँग्रेस यांनी एकमेकांना दिला आहे. मात्र आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेने (यूबीटी) माघार घेतली आहे. आता नागपूर शहरात काँग्रेस सर्व सहा मतदारसंघात लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. येथील निश्चित केलेल्या उमेदवारांना काँग्रेसने तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाविकास आघाडीत नागपूरच्या जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडल्या. मंगळवारी (ता.22)रात्री 9 च्या सुमारास दक्षिण नागपूर मतदारसंघ काँग्रेसच लढणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दक्षिणेतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दक्षिण नागपूरमध्ये 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी बंडखोरी केली होती.
मात्र ते पाच हजार मतांवरच थांबले. भाजपचे मोहन मते आणि काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात येथे चुरशीचा मुकाबला झाला होता. आमदार मते यांनी अवघ्या चार हजार मतांनी पांडव यांच्यावर विजय मिळवला होता. याच मतांच्या आकडेवारीवर काँग्रेसने हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिसकावून घेतला आहे.
पुन्हा पांडव यांच्यावर काँग्रेस दाव लावण्याची दाट शक्यता आहे. युतीमधून आघाडीत सहभागी झाल्यानंतर प्रथमच शिवसेनेला (यूबीटी) नागपूर शहरात आता एकही अधिकृत उमेदवार राहणार नाही.
भाजपसोबत युती असताना सुरुवातीला शिवसेना शहरात दोन आणि ग्रामीणमध्ये दोन असे चार विधानसभा मतदारसंघात लढत होती. शहरात आजवर शिवसेनेला आपले खाते उघडता आले नाही. ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातून अशिष जयस्वाल यांनी शिवसेना खाते उघडून दिले होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये नागपूर ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघाचा वाद सुरू आहे. ही जागा शिवसेनेला (यूबीटी) मिळण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही. महायुतीने रामटेक मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला आहे.येथे बंडखोरांना रोखणे एवढचे आता भाजपच्या हाती आहे.
रामटेकमधील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. ते बंडखोरी करतील याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यांना पक्षाबाहेर काढून भाजपने चर्चेचा मार्ग बंद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.