Laxman Hake Video : '...तेव्हा मनोज जरांगे रुग्णालयात दाखल होतील', लक्ष्मण हाकेंच्या दाव्याने खळबळ

laxman hake criticized Manoj Jarange Patil : आनंदराज आंबेडकर, मुस्लिम धर्मगुरू जरांगेला भेटले. मात्र, ओबीसीच्या आंदोलनाबाबत जरांगेची जी भूमिका आहे ती आनंदराज आंबेडकरांना मान्य आहे का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
 Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Laxman Hake Vs Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्या सांगितले होते. तसेच ज्यांना सांगेन त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे असे आवाहन देखील केले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवार उभे करण्याच्या दाव्याची ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी खिल्ली उठवली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, 'जरांगे आज एक बोलतील, संध्याकाळी एक बोलतील, उद्या एक बोलतील. मला वाटतंय चार तारखेनंतर मनोज जरांगे एका हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट झालेले असतील. सलाईन लावलेली असेल. जरांगे निवडणुकीत माणसं उभी करणार नाहीत.'

आनंदराज आंबेडकर, मुस्लिम धर्मगुरू जरांगेला भेटले. मात्र, ओबीसीच्या आंदोलनाबाबत जरांगेची जी भूमिका आहे ती आनंदराज आंबेडकरांना मान्य आहे का? मोमीन म्हणून धर्मगुरू जरांगेला भेटले. मी या आधी त्यांचे नाव कधी ऐकले नाही. विशाळ गडावरती मुस्लिमांचे धर्मस्थळ पाडले जात असताना त्याला संभाजी भोसलेंचा पाठींबा जरांगेना चालतो. तर 'एमएम'डी कसं अस्तित्वात येऊ शकतं? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

 Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Rupali Chakankar : अरविंद सावंतांच्या अडचणी संपेनात, महिला आयोगाने उचलले मोठे पाऊल

आमची यादी तयार

लक्ष्मण हाके म्हणाले आम्ही वाट बघतोय जरांगे कुठं माणसं उभ करतायेत. पण आमची यादी आधीच तयार आहे. कुठं उभं करायचं आणि कुठं पाडायचं ते. काही ठिकाणी आमची माणसं उभी आहेत. 10 ते 15 ठिकाणी जिंकूण येतील, अशी माणसं आमची उभी आहेत.

 Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
Shivsena UBT : मनसे विरुद्ध तक्रार, भाजपचा आक्षेप पण उद्धव ठाकरेंच म्हणणं निवडणूक आयोगानं ऐकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com