Rupali Chakankar : अरविंद सावंतांच्या अडचणी संपेनात, महिला आयोगाने उचलले मोठे पाऊल

Rupali Chakankar Women Commission arvind sawant : रुपाली चाकणकर यांनी राजकारणात,समाजकारणात वावरणाऱ्या व्यक्तींनी महिलांबाबत बोलताना भान बाळगणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला आहे.
Rupali Chakankar  arvind sawant
Rupali Chakankar arvind sawantsarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अरविंद सावंत यांच्या अडचणी संपण्याच्या नाव घेत नाहीत. अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असताना आता या प्रकरणाची दखल महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अरविंद सावंत यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

रुपाली चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत की, खासदार अरविंद सावंत यांनी महिला नेत्या शायना एन सी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलेले आहे.राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून मुंबई पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

रुपाली चाकणकर यांनी राजकारणात,समाजकारणात वावरणाऱ्या व्यक्तींनी महिलांबाबत बोलताना भान बाळगणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते सावंत?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार शायना एन सी यांना उद्देशून 'इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असे म्हटले होते. सावतं यांच्या या वक्तव्यावरून मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Rupali Chakankar  arvind sawant
Shivsena UBT : मनसे विरुद्ध तक्रार, भाजपचा आक्षेप पण उद्धव ठाकरेंच म्हणणं निवडणूक आयोगानं ऐकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com