Assembly Voting Percentage : महाराष्ट्रात आज चाललंय काय ? गडचिरोली, झारखंडच्या मतदारांना सलाम

Maharashtra election day updates and voter turnout : महाराष्ट्रासह आज मतदान होत असून झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे.
Assembly Election
Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात मतदानाला अपेक्षित उत्साह दिसून येत नाही. सकाळी 7 ते दुपारी 1 या सहा तासांत केवळ 32 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, मुंबई महानगरात सर्वात कमी मतदानाचा टक्का असताना राज्यात सर्वाधिक 50 टक्के मतदान गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात झाले आहे. त्याचबरोबर झाऱखंड राज्यानेही महाराष्ट्राला मागे टाकले आहे.

मतदानामध्ये उदासिनता दिसत असल्याचे चित्र आहे. गडचिरोली वगळता बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये मतांचा टक्का वाढताना दिसत नाही. प्रामुख्याने राज्यातील महानगरे आणि शहरी भागात मतांची टक्केवारी खूप कमी आहे. मुंबई शहरामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत केवळ 27.73 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ पुण्यातही 30 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.

Assembly Election
Narayan Rane : महायुती, ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? नारायण राणेंचा अंदाज 'सबसे अलग'

तुलनेने गडचिरोली मतदारसंघात राज्यात सर्वाधिक 50.89 टक्के मतदान झाले आहे. त्याचप्रमाणे गोंदियातही 40 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीतही मुंबईसह पुणे व इतर शहरी भागांमध्ये मतांचा टक्का कमी होता. ही टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने बुधवारी मतदान ठेवले. पण त्यानंतरही मतदान वाढताना दिसत नाही.

झारखंडमध्ये 47 टक्के मतदान

झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत 47 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. हे राज्यही नक्षलग्रस्त असून मोठा भाग आदिवासीबहुल आहे. त्यामुळे तिथेही मतदारांचा उत्साह महाराष्ट्रापेक्षा अधिक दिसून येत असल्याचे दिसते.

Assembly Election
Bogus Voting in Parli : परळीत बोगस मतदानात मुंडेंचे कार्यकर्ते आघाडीवर; देशमुखांच्या आरोपाने खळबळ

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर -  ३२.९० टक्के, अकोला - २९.८७ टक्के, अमरावती - ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड - ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ टक्के, चंद्रपूर- ३५.५४ टक्के, धुळे - ३४.०५ टक्के, गडचिरोली-५०.८९ टक्के, गोंदिया - ४०.४६ टक्के, हिंगोली -३५.९७ टक्के, जळगाव - २७.८८ टक्के, जालना- ३६.४२ टक्के, कोल्हापूर- ३८.५६ टक्के, लातूर - ३३.२७ टक्के, मुंबई शहर- २७.७३ टक्के.

मुंबई उपनगर - ३०.४३ टक्के, नागपूर - ३१.६५ टक्के, नांदेड - २८.१५ टक्के, नंदुरबार - ३७.४० टक्के, नाशिक - ३२.३० टक्के, उस्मानाबाद - ३१.७५ टक्के, पालघर - ३३.४० टक्के, परभणी - ३३.१२ टक्के, पुणे - २९.०३ टक्के, रायगड - ३४.८४ टक्के, रत्नागिरी - ३८.५२ टक्के, सांगली - ३३.५० टक्के, सातारा - ३४.७८ टक्के, सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के, सोलापूर - २९.४४, ठाणे -२८.३५ टक्के, वर्धा - ३४.५५ टक्के, वाशिम - २९.३१ टक्के, यवतमाळ -३४.१० टक्के.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com