Eknath Shinde : जे घडलं ते सगळं नाना पटोलेंमुळेच! एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले, ना ना करते प्यार..!

Maharashtra Assembly Special Session : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Eknath Shinde, Nana Patole
Eknath Shinde, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकमताने निवड झाल्यानंतर शिंदेंनी अभिनंदनपर भाषण करताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची आठवण करून दिली. 

नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी राहुल नार्वेकर यांच्याकडे हे पद आले. पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले नसते, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. एकनाथ शिंदे यांनीही पटोलेंनाच त्यासाठी जबाबदार धरले. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंमुळेच नार्वेकरांची वाट मोकळी झाल्याचे विधान केले होते.

Eknath Shinde, Nana Patole
Mahayuti Ministers : भावाच्या मंत्रिपदासाठी आमदारांच्या बंधूंची धावाधाव; दिल्ली-मुंबईत फिल्डींग...

विधानसभेत सोमवारी बोलताना शिंदे म्हणाले, नाना पटोलेंचे आभार मानतो. तुम्ही नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त केले आणि तिथून गाडी सुरू झाली. याचं सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे. त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील, ते जाऊदा. पण त्यांचं आमचं प्रेम आहे.

शिंदे हे बोलत असतानाच शेजारी बसलेले मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’, या हिंदी गीताची आठवण करून दिली. शिंदेंनीही या ओळी म्हणत नाना पटोलेंना टोला लगावला. आम्ही मुळ विसरत नाही, असे सांगत शिंदेंनी पटोलेंना मागील अडीच वर्षांतील सर्व राजकीय घटनाक्रमाचे क्रेडिट दिले. यावेळी समोर बसलेले नाना पटोले हसत होते.

Eknath Shinde, Nana Patole
Rohit Patil : ज्यादिवशी आर.आर आबांची विधानसभेतून एक्झिट, त्याचदिवशी लेकाची एन्ट्री! आबांचे ते पत्र व्हायरल...

ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी आज बेळगावच्या मुद्यावरून सभात्याग केला. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, काही लोक दिसत नाहीत, बहिष्कार टाकला वाटतं. लोकसभावनेची कदर केली पाहिजे. लोकभावनेची दिशा वेळीच ओळखली असती तर त्यांची ही दशा झाली नसती, असा टोला शिंदेंनी लगावला. विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे. असे व्हायला नको होते. जनतेने दिलेला कौल मान्य करावा, असेही शिंदे म्हणाले.

नार्वेकरांचे कौतुक

2022 हा कसोटीचा काळ होता. सुप्रीम कोर्टाने महत्वाची जबाबदारी टाकली होती. टॉपचे वकील कायद्याचा कीस काढत होते. त्याहीवेळी आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने निर्णय दिला. तोल ढळू दिला नाही. आपण घेतलेला निर्णय योग्यच होता. कारण जनतेनेही तोच न्याय दिला आहे. शिवसेना कुणाची, हे निवडणूक निकालामध्ये हे स्पष्ट झाले आहे, असे सांगत शिंदेंनी नार्वेकरांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com