राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं ; अजितदादांनी विरोधकांना सुनावलं

मुख्यमंत्री पदाचा पदभार कोणाकडे द्यावा, असं जरी कोणी बोलत असतील तर बाकीच्यांनी यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही
Ajit Pawar 

Ajit Pawar 

sarkarnama

मुंबई : हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) अनुपस्थितीवरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांचा चार्ज अन्य कोणाकडे तरी द्यावे, अशी मागणी विरोधकांनी करुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं. ''मुख्यमंत्र्यांचा चार्ज कोणाला द्यायचा, हे आम्ही ठरवू बाहेरच्यानी त्यात नाक खुपसायची काही गरज नाही,'' असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

अजित पवार म्हणाले, ''मुख्यमंत्री येणार होते, पण आम्ही नको सांगितलं. मुख्यमंत्री वर्षावरून कामकाज पाहत होते. बाकीच्यांनी काळजी करायची गरज नाही. मुख्यमंत्री पदाचा पदभार कोणाकडे द्यावा, असं जरी कोणी बोलत असतील तर बाकीच्यांनी यामध्ये नाक खुपसायचं कारण नाही,''

''आमची सर्वांचीच इच्छा होती की मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं. चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा मी केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत,” असं अजित पवार म्हणाले.

''विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहले होते. मतदानात पारदर्शकता यावी, यासाठी नियमात बदल करत आवाजी मतदान घेण्याची तयारी केली होती. लोकसभेत जे नियम आहेत त्याप्रमाणे नियमात बदल केले. राज्यापालांनी निर्णय घेतला नाही. घटनात्मक बाबी आहेत असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल यांचा आम्ही आदरच करतो. घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन पुढे निवडणूक घेऊ,'' असे अजित पवार यांनी सांगितलं.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar&nbsp;</p></div>
राणेंच्या मॅव..मॅव..ला शिवसेनेचं प्रत्युत्तर ; ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक’

''दोन तीन दिवसांत आम्ही मुख्यमंत्र्यां सोबत बसत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चा करुन राज्यपालांची भेट घेऊ,'' असे पवार म्हणाले. ''ज्यांच्याकडे बहुमत असते असे सरकार बरखास्त होत नसते, सरकार बरखास्त कारण्यासाठी काही नियम असतात, विधेयक मंजूर होऊ नये, असे विरोधकांना वाटत होते म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला,'' असे टोमणा अजित पवारांनी लगावला.

“राज्य कशा पद्धतीने चालवायचं असतं आम्हालाही कळतं. मी ३० वर्ष काम करतोय, बाळासाहेब ३५ वर्षे काम करत आहेत. कोणी विधानपरिषदेचा सदस्य बोलतो की ४ दिवसात राज्य विकतील, राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं,” असं अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com