राणेंच्या मॅव..मॅव..ला शिवसेनेचं प्रत्युत्तर ; ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक’

पोलिसांकडून संतोष परब हल्लाप्रकरणाच्या सूत्रधाराचे नाव का जाहीर केले जात नाही, असा सवाल वैभव नाईक यांनी विचारला.
Nitesh Rane,  Aditya Thackeray

Nitesh Rane,  Aditya Thackeray

sarkarnama

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. संतोष परब यांच्या हल्ल्यामागे भाजपचे नेते, आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राणेंना अटक करण्याची मागणी होत आहे.

शिवसेनेने आज कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नीतेश राणेंनी अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत नितेश राणेंची खिल्ली उडवली. पोलिसांकडून संतोष परब हल्लाप्रकरणाच्या सूत्रधाराचे नाव का जाहीर केले जात नाही, असा सवाल वैभव नाईक यांनी विचारला.

शिवसेनेचे नेते, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी अधिवेशनात येत असताना विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या नीतेश राणे यांनी आदित्य पायऱ्यांजवळ येताच 'मॅव... मॅव...' करीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचलं. होतं 'आधी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता 'मॅव...मॅव...पुरतीच उरल्याचा टोला नितेश राणे यांनी हाणला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसनेनं आज ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत राणेंना प्रत्युत्तर दिलं.

<div class="paragraphs"><p><a href="https://www.sarkarnama.in/topic/nitesh-rane">Nitesh Rane</a>,&nbsp; Aditya Thackeray</p></div>
भाजपनं राज्यपालांचे कान भरले ; विधानसभा अध्यक्ष निवडणुक कधी?

या प्रकरणी नीतेश राणे यांना पोलिसांना दोन वेळा चैाकशी केली आहे. संतोष परब (Santsoh Parab) यांच्यावरील हल्ल्याचे खरे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नीतेश राणे यांनाही अटक होणार का..? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागल आहे. अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. आणि जर करायची असेल तर विधानसभेत आधी परवानगी घ्यावी लागते.

राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात (Sindhudurg District Bank Election) १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Santosh Parab half murder case) झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत. दरम्यान, नीतेश राणे यांनी आज अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (ता.२८) सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com