Congress Politics : निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांना हटवले, तरी काँग्रेसचा सरकारच्या 'त्या' शब्दावर आक्षेप

Rashmi Shukla Atul Londhe Sanjay Varma Election Commission : अतुल लोंढे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती. दुसऱ्या कोणत्याही पदासाठी नाही.
Rashmi Shukla Atul Londhe Sanjay Varma
Rashmi Shukla Atul Londhe Sanjay Varmasarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेसची ही मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले आहे.मात्र,

निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती केली असताना राज्य सरकारने ‘तात्पुरती नियुक्ती’चा आदेश कसा काढला, असा आक्षेप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी घेतला आहे.

लोंढे यांचा ‘तात्पुरती नियुक्ती’ या शब्दाला विरोध आहे. 24 तासाच्या आत संजय वर्मांच्या परमनंट नियुक्तीचा आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु,असा इशारा लोंढे यांनी दिला आहे.

IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांना पोलिस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती, असा उल्लेख केलेला नाही. तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

Rashmi Shukla Atul Londhe Sanjay Varma
Ajit Pawar : 'जयंत पाटलांना वाटलं असेल कशाला मी 'तुतारी'चा..' ; अजित पवारांनी लगावला टोला!

अतुल लोंढे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना मिळालेली मुदतवाढ ही फक्त पोलीस महासंचालक पदासाठीच होती. दुसऱ्या कोणत्याही पदासाठी नाही. त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याक्षणी निवडणूक आयोगाने त्यांना पोलिस महासंचालक पदावरून हटवले त्याक्षणी त्या कायद्यानुसार निवृत्त झालेल्या आहेत, असे असताना त्यांना रजेवर कसे पाठवले जाते.

महाराष्ट्रात एकच अधिकारी सरकारच्या सर्वात लाडक्या आहेत का? रश्मी शुक्लाच का? दुसरे अधिकारी नाहीत का? सदानंद दाते, रितेशकुमार, संजय वर्मा, फणसाळकर हे सक्षम अधिकारी नाहीत का? 60 वर्ष झाल्यांनतरही एकाच व्यक्तीसाठी आग्रह का? याचे उत्तर आशिष शेलार यांनी द्यावे, असे आवाहनही लोंढे यांनी केले.

शुक्लांच्या नियुक्तीसाठी नियम धाब्यावर?

रश्मी शुक्ला निवृत्त झाल्या तरी त्यांच्यासाठी वेगळा कायदा लावला जातो, कायद्याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना नियुक्ती दिली जाते. रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यासाठी सर्व कायदे, नियम, संविधान, सुप्रिम कोर्टाचा निकाल बाजूला ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकार करत आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

रश्मी शुक्ला यांच्या मदतीने निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा भाजपा युती सरकारचा हा प्रयत्न आहे. पोलिस वाहनातून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवले जाते, अशी माहिती मिळाल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगत आहेत यातच रश्मी शुक्लाच का, याचे उत्तर दडले आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

(Edited By Roshan More)

Rashmi Shukla Atul Londhe Sanjay Varma
Raosaheb Danve: फडणवीस मुख्यमंत्री होणार का? दानवेंच्या उत्तराने महायुतीच्या सीएमबाबत उत्सुकता वाढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com