
Avinash Jadhav news : मीरा-भाईंदरमध्ये मनसेने आज मोर्चाची हाक दिली होती. मात्र मराठी माणसाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसे नेते अविनाश जाधव यांना रात्री तीन वाजता ताब्यात घेण्यात आले. दुपारी मोर्चेकरी आक्रमक झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर अविनाश जाधव मोर्चात सहभागी झाले. स्थानबद्धता ते सुटका अशा अकरा तासांत काय काय घडलं हे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं..
अविनाश जाधव म्हणाले, अकरा तासांनंतर एका गोष्टीचा आनंद आहे की मीरा भाईंदरमधील मराठी माणूस एकवटला. तिथला जो एक आमदार आहे तो नेहमीच लोकांना सांगतो मीरा भाईंदरमध्ये काय दहा -बारा टक्के मराठी लोक राहतात, ते काय करुन घेतील. त्या सगळ्यांना या मराठी माणसाने उत्तर दिलं आहे. आमचा टक्का कितीही असो आम्ही तुम्हाला भारीच पडू हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्याचा मला प्रचंड आनंद आहे.
मला वाटतं की, ज्या पद्दतीने मला सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं, आमच्या दीड ते पावणे दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना स्थानबद्ध करण्यात आले, याची गरजच नव्हती. जर व्यापारी परवानगी न घेता मोर्चा काढू शकता तर आम्ही भूमिपुत्र आहोत. मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, आम्हाला परवानगी द्यायला यांना काय अडचण होती. पोलिसांकडून जी काही कारणे दिली गेली ती चुकची आहे.
पोलिसांनी आम्हाला मोर्चाचा मार्ग बदलण्यास सांगितला, हे जे काही सांगतात ते अत्यंत खोटं आहे. पोलिसांचा आमच्या मोर्चाला विरोधच होता. सरकारकडून मोर्चाला विरोध होता. स्थानिक आमदार हा गृह खात्याच्या दबावापोटी आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न करत होता. स्थानिक आमदार व गृह खाते या दोघांनी आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला तो रस्त्यावर उतरल्याचं अविनाश जाधव म्हणाले.
जाधव म्हणाले, माझ्या घरी पोलिस आले. त्यांना माझा पहिला प्रश्न होता. की मराठी माणसासाठी हा मोर्चा काढत आहोत तरी तुम्ही कसं काय परवानगी नाकारु शकता आणि अधिवेशन सुरु आहे अशात जर तुम्ही मला घेऊन जात असाल तर तुम्हाला हे वाटत नाही का की हे सरकारच्या विरोधात जाईल. तेव्हा माझ्यावर प्रचंड दबाव आहे असं पोलिस अधिकारी मला म्हटला.
मग असा कुणाचा दबाव त्यांच्यावर होता की, अधिवेशन चालू असताना मध्यरात्री 3 वाजता मला घरुन ताब्यात घेण्यात आली. तिथून मीरा भाईंदरला आणण्यात आलं. तेथून मला एका ऑफिसला नेलं. तिथून पालघरच्या टोकाला मला घेऊन गेल्याचं जाधव यांनी सांगितलं. हे सगळं प्रचंड दबावापोटी केलं गेलं. पोलिस अधिकाऱ्यांना माझ्यासोबत हे करायचं नव्हतं पण त्यांच्यावर दबाव होता. त्यातून माझ्यावर कारवाई केल्याचे जाधव म्हणाले.
आम्ही दहा वाजता हा मोर्चा काढणार होतो. दोन किलोमीटर चालून साडे अकरा पर्यंत हा मोर्चा संपला असता. पण रात्री तीन वाजता पोलिसांनी मला माझ्या कुटुंबाला उठवले आणि नंतर ते मीरा भाईंदरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी मला पालघरमध्ये शिफ्ट केलं. आमच्या लोकांना उचलून उचलून पोलिसांनी फेकलं. सहा-सहा महिलांना एका रिक्षात तुम्ही कसं भरु शकता. त्यांचे कपडे कुठे चालले. त्यांचा आदर तर तुम्ही करा. ती एक महिला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.
सकाळपासून दीड हजार मनसैनिकांना पोलिसांनी आत टाकलं. त्यानंतरही रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जर कार्यकर्ते उतरले असतील, तर ही लोकभावना आहे. यामुळे मीरा भाईंदरमधील स्थानिक आमदाराला इथला मराठी माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.