Dhananjay Munde On Jitendra Awhad : मुश्रीफांनी मिठी मारली तर बरगड्या जागेवर राहतील का ? आव्हाडांना मुंडेंचा टोला..

NCP Political News : आज कोल्हापूरातच आव्हाड यांना अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama

Kolhapur Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांचे वस्त्रहरण केले जात आहे. शरद पवार यांच्या स्वाभीमान सभेतून अजित पवार गटाच्या मंत्री आणि नेत्यावर टीका केली जातेय. (Kolhapur NCP Rally News) तर त्याला अजित पवार गटाने उत्तरदायित्व सभेतून प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. कोल्हापूरच्या स्वाभीमान सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांना साप म्हणत अशा सापांना तुडवण्यासाठी कोल्हापुरातील पायतानाचा वापर करावा लागेल, असा इशारा दिला होता.

Dhananjay Munde News
Uddhav Thackeray On CM Eknath Shinde : ऋषी सुनक काय बोलले ते कळलं का ? ठाकरेंचा टोला..

आज कोल्हापूरातच आव्हाड यांना अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रत्युत्तर दिले. हसन मुश्रीफांनी तुम्हाला प्रेमाने जरी मिठी मारली, तर तुमच्या बरगड्या जागेवर राहतील का? असा जोरदार टोला मुंडे यांनी आव्हाड यांना लगावला. यावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. ज्या कोल्हापूरात आव्हाड यांनी (Hasan Mushrif) हसन मुश्रीफ यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, त्याची व्याजासकट धनंजय मुंडे यांनी परतफेड केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही, ते पायतानाची भाषा करतात. ज्यांनी पायतानाची भाषा केली त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बरगड्या राहतील का? अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात. (Maharashtra) शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरीक कधी सहन करणार नाहीत.

ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात, असे म्हणत मुश्रीफ यांच्यानंतर बीडच्या सभेत मुंडेवर टीका करणाऱ्या आव्हाडांचा समाचार मुंडे यांनी घेतला. बीड येथे झालेल्या स्वाभीमान सभेत आव्हाड यांनी मुंडे यांचा उल्लेख अरे पळकुट्या असा केला होता. कोल्हापूरात मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देतांना मुंडेनी बीडमध्ये त्यांच्यावर केलेल्या टीकेचाही वचपा काढल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. बीड आणि कोल्हापूरचे आगळ वेगळे नात आहे. तुम्ही ऊस पिकवणारे आणि आम्ही ऊस तोडणारे आहोत, असेही मुंडे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com